९० टक्के रुग्ण लक्षणविरहीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

९० टक्के रुग्ण लक्षणविरहीत
९० टक्के रुग्ण लक्षणविरहीत

९० टक्के रुग्ण लक्षणविरहीत

sakal_logo
By
९० टक्के रुग्ण लक्षणविरहीत सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ३ : मुंबईत आज ८०८२ नवीन रुग्णांची भर पडली; मात्र त्यापैकी ७२७२ (९० टक्के) रुग्ण लक्षणे विरहित आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांपैकी केवळ ५७४ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले असून त्यापैकी केवळ ७१ रुग्णांना ऑक्सिजन बेडची गरज भासली. सध्या पालिकेकडे कोविडबाधितांसाठी ३०,५६५ खाटा तयार असून त्यातील केवळ ३७३५ (१२.२ टक्के) खाटा भरल्या आहेत. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ३७,२७४ इतकी झाली आहे. मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी १३८ दिवसांपर्यंत खाली आला आहे. नवीन रुग्णांमध्ये गंभीर रुग्ण तसेच मृतांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. आज केवळ दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने बरे झालेल्या रुग्णांच्या दरात मात्र घट होत आहे. एकेकाळी ९९ टक्क्यांवर असलेला हा दर आता ९० टक्के झाला आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top