नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करणारा आरोपी दिल्ली येथून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करणारा आरोपी दिल्ली येथून अटक
नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करणारा आरोपी दिल्ली येथून अटक

नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करणारा आरोपी दिल्ली येथून अटक

sakal_logo
By
नोकरीच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक नालासोपारा, ता. ४ (बातमीदार) : नोकरी लावण्याच्या बहाण्याने एक लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने दिल्ली येथून अटक केली आहे. सुनीलकुमार गुप्ता (३१) असे आरोपीचे नाव असून, तो बिहार राज्यातील बक्सर जिल्ह्यातील राहणारा आहे. रितेशकुमार दुबे या व्यक्तीस नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने सुनीलकुमारने त्याची एक लाखांची फसवणूक केली होती. याबाबत विरार पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. प्रभारी पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून रविवारी (ता. २) सुनीलकुमारला दिल्ली येथून अटक केली.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top