भिवंडीत बादलीत पडून एक वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत  बादलीत पडून एक वर्षीय चिमुकल्याचा  दुर्दैवी मृत्यू...
भिवंडीत बादलीत पडून एक वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू...

भिवंडीत बादलीत पडून एक वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू...

sakal_logo
By
बादलीत पडून चिमुकल्याचा मृत्यू भिवंडी, ता. ४ (बातमीदार) ः एक वर्षाचा चिमुकला रांगत रांगत खेळत असताना बाथरूममधील पाण्याने भरलेल्या बादलीत पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील देऊनगर परिसरात घडली. याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिलकैश अन्सारी (१) असे चिमुरड्याचे नाव आहे. घटनेच्या वेळी दिलकैशची आई रात्रीचे जेवण करण्यासाठी स्वयंपाकघरात; तर त्यांची इतर मुले घरात हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होती. त्या वेळी खेळता खेळता दिलकैश बाथरूममधील पाण्याने भरलेल्या बादलीत जाऊन पडला. यात त्याचा मृत्यू झाला. दिलकैशला सहा भावंडे असून तो सर्वांत लहान होता.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top