मुंबई
मुरबाडची प्रसिद्ध म्हसा यात्रा अखेर रद्द
मुरबाडची प्रसिद्ध म्हसा यात्रा अखेर रद्द
कोट्यवधी रुपयांची उलाढाल थंडावणार
सरळगाव, ता. ४ (बातमीदार) : कोरोनाने डोके वर काढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुरबाडमधील प्रसिद्ध म्हसा यात्रा या वर्षीही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुरबाडचे तहसीलदार संदीप आवारी यांनी ही माहिती दिली. आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. ३) झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यात्रा रद्द झाल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबणार आहे.
म्हसा यात्रेला २०० वर्षांची परंपरा आहे. यात्रेत संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो व्यावसायिक, भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. ही यात्रा चादरी, खिल्लारी बैलांच्या खरेदी-विक्रीसाठीही प्रसिद्ध असल्याने कोट्यवधींची उलाढात होते. सलग १५ दिवस यात्रा सुरू राहत असल्याने लोकनाट्य, मौत का कुवा, रेकॉर्ड डान्स, जादूचे प्रयोग, उंच पाळणे आदी खेळ आणि मनोरंजनाची साधने या ठिकाणी येतात. याचबरोबर मिठाई, प्रसाद, खानावळी, वडापाव, सरबताची दुकानेही थाटली जात असल्याने व्यावसायिकांनाही कमाईची आशा असते. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे म्हसा यात्रा होऊ न शकल्याने या वर्षीचे काय अशी चर्चा होती. कोरोनाची लाट ओसरत चालल्याने या वर्षी म्हसा यात्रा होणार, असे संकेत मिळू लागल्याने यत्रेकरू व व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते, परंतु यंदाही यात्रा रद्द झाल्याने व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.