कोरोनाचा धोका वाढतोय

कोरोनाचा धोका वाढतोय

Published on
पाच दिवसांत कोरोना रुग्ण तीनपट नागरिकांना नियमांचा विसर सकाळ वृत्तसेवा डोंबिवली, ता. ४ ः कल्याण-डोंबिवली शहरात कोरोना संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दिवसाला रुग्णांची आकडेवारी ही २०० च्या पार जाऊ लागली आहे. ३० डिसेंबरला शहरात ६७ रुग्ण आढळले होते. तीच संख्या अवघ्या पाच दिवसांत तीन पट होऊन ३ जानेवारीला २०५ रुग्ण आढळले. कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीने तिसरी लाट येण्याचा धोका संभवतो आहे; मात्र तरीदेखील नागरिक बेफीकीर असून विनामास्क, सोशल डिस्टन्सिंग न पाळता बाजारपेठांमध्ये दिसून येत आहेत. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागातील एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर तर पालिका प्रशासन आणखीनच सतर्क झाले आहे. तिसऱ्या लाटेचे संकेत शासनाकडून दिले जात असून कोरोना निर्बंधही कडक करण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे प्रशासन तिसऱ्या लाटेला गांभीर्याने घेत असताना नागरिक मात्र त्याला अद्यापही मनावर घेताना दिसत नाहीत. बाजारात फिरताना, गर्दीत वावरताना मास्क लावण्यास नागरिक टाळाटाळ करीत आहेत. त्यात बदलत्या हवामानामुळे शहरात सर्दी, खोकला, तापाची साथ पसरत आहे. दररोज २०० रुग्णांची नोंद राज्यातील पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण डोंबिवलीत आढळून आल्यानंतर मात्र कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाने नियमावली जाहीर केली. नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. डिसेंबरअखेरीस दिवसाला कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०० च्या आसपास होती; मात्र मागील दोन दिवसांपासून २०० पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. दृष्टिक्षेपात - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असून पालिका हद्दीतील कोविड रुग्णालये सुसज्ज करण्यावर भर दिला जात आहे. - मास्क, सॅनिटायझेशन व सामाजिक अंतराचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. - विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू. तारीख बाधित उपचार घेत असलेले रुग्ण ३० डिसेंबर ६७ ३५४ ३१ डिसेंबर ११७ ४५४ १ जानेवारी १५१ ५८० २ जानेवारी २१४ ७५६ ३ जानेवारी २०५ ९४८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com