वैद्य साने आयुर्वेद लॅबोरेटरीज लिमिटेड (माधवबाग) यांना एसएमई आयपीओकरता एनएसईची मंजुरी

वैद्य साने आयुर्वेद लॅबोरेटरीज लिमिटेड (माधवबाग) यांना एसएमई आयपीओकरता एनएसईची मंजुरी

माधवबागला आयपीओकरिता एनएसईची तत्त्वतः मंजुरी मुंबई, ता. ४ ः कार्डिअॅक क्लिनिक्सची वैशिष्ट्यपूर्ण साखळी असलेली वैद्य साने आयुर्वेदिक लॅबोरेटरिज लिमिटेड ही एकमेव संस्था आहे. ‘माधवबाग’ या नावाने प्रसिद्ध असलेली ही संस्था हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि स्थूलता अशा दीर्घकालिक आजारांवर उपचार करते. आधुनिक तंत्रज्ञानाची पारंपरिक आयुर्वेदिक रोगोपचारांशी सांगड आपल्या उपचारांमध्ये घालण्याचा अनोखा दृष्टिकोन ठेवणाऱ्या या संस्थेने तिचे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस् (DRHP) सादर केले असून त्यास एनएसईची तत्त्वतः मान्यता प्राप्त झाली आहे. माधवबाग तिच्या उपचारांमध्ये विनाशस्त्रक्रिया, बहुशाखीय आणि नावीन्यपूर्ण उपचारपद्धतींचा उपयोग करते. संस्थेने सादर केलेल्या ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस्‌नुसार, संस्थेच्या पब्लिक इश्‍यूमध्ये २७,७१,२०० नवे समभाग प्रत्येकी रु. ७३.०० या दराने जारी केले जाणार आहेत. यातून संस्थेला एकूण २०.२३ कोटी इतके भांडवल प्राप्त होणार आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले डॉ. रोहित माधव साने हे कंपनीचे प्रवर्तकदेखील आहेत. या पब्लिक इश्यूद्वारे प्राप्त झालेल्या निव्वळ भांडवली रकमेचा विनियोग कंपनीच्या ब्रँडिंग व प्रचार खर्चाकरिता तसेच व्यवसायवृद्धीच्या संधी, नीतीविषयक उपक्रम, जॉईंट व्हेन्चर्स, भागीदारी, विपणन आणि व्यवसायवृद्धीसाठीचे खर्च, कंपनीच्या सोयीसुविधांचा विस्तार आणि कंपनीच्या सामान्य कामकाजामध्ये होणारे व अचानक उद्भवणारे खर्च भागवण्याकरिता करण्याचे प्रस्तावित आहे. कंपनी आपल्या ‘माधवबाग कार्डिअॅक क्लिनिक्स अँड हॉस्पिटल्स’ या ब्रँड नावाखाली महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, गोवा आणि कर्नाटक राज्यांमध्ये २७४ क्लिनिक्स चालवते आहे. यांपैकी ५२ क्लिनिक्स हे कंपनीच्या स्वतःच्या मालकीचे तर २२२ क्लिनिक्स हे फ्रँन्चाईज क्लिनिक्स आहेत. याचबरोबर कंपनी दोन सुसज्ज हृदयरोग प्रतिबंध आणि पुनर्वसन (कार्डिअॅक प्रीव्हेन्शन अँड रिहॅबिलिटेशन) हॉस्पिटल्सदेखील चालवते, जी खोपोली आणि नागपूर येथे स्थित आहेत. ... ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस्‌ उपलब्ध वैद्य साने आयुर्वेदिक लॅबोरेटरीज लिमिटेडचे ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस्‌ एनएसईच्या संकेतस्थळावर, तसेच लीड मॅनेजर फर्स्ट ओव्हरसीज कॅपिटल लिमिटेड यांच्या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहे. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com