तीन घटनेत पाच गाड्यांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा,
ठाणे : ता, ४ ः गेल्या चोवीस तासात ठाणे शहरात घडलेल्या वेगवेगळ्या तीन आपत्तीजन्य घटनांमध्ये पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये तीन चारचाकी गाड्यांचा समावेश असल्याचे दिसत आहे. एका घटनेत दोन गाड्यांना आग लागली आहे. तर इतर दोन घटनांमध्ये झाड आणि झाडाची फांदी पडून गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
साई सुदामा सोसायटीसमोर पार्क केलेल्या चारचाकी वाहनांवर झाड उन्मळून पडल्याची घटना सोमवारी घडली होती. त्यामध्ये त्या गाडीचे नुकसान झाले आहे. तर ठाणे रेल्वे स्टेशन जवळ झाडाची फांदी तेथे पार्क केलेल्या दोन दुचाकीवर पडल्याने त्या दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच सोमवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास माजिवडा, ओसवाल पार्कजवळ, राणे पार्किंग कंपाऊंडच्या आवारात अचानक आग लागली. त्याची झळ तेथील दोन टेम्पोला बसल्याने त्यामध्ये त्या टेम्पोचे नुकसान झाले आहे. या घटनांची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. या तिन्ही घटनांध्ये कोणतीही जीवित हानी अथवा कोणालाही दुखापत झाली नसल्याचे आपत्ती विभागाकडून सांगण्यात आले आहे.