विद्यापीठ, महाविद्यालयांचे शिक्षणही ऑनलाईन सुरू करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठ, महाविद्यालयांचे शिक्षणही ऑनलाईन सुरू करा
विद्यापीठ, महाविद्यालयांचे शिक्षणही ऑनलाईन सुरू करा

विद्यापीठ, महाविद्यालयांचे शिक्षणही ऑनलाईन सुरू करा

sakal_logo
By
विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शिक्षणही ऑनलाईन सुरू करा वसतिगृहावरही मर्यादा हव्यात; कुलगुरूंच्या बैठकीतील सूर मुंबई, ता. ४ : राज्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने राज्यातील विद्यापीठे, त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांतील शिक्षण हे ऑनलाईन सुरू केले जावे आणि वसतिगृहेही बंद करून त्यांवर मर्यादा आणल्या जाव्यात, असा सूर आज राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंनी लावला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोरोनाचे वाढते रुग्ण आणि एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत ऑनलाईन बैठक घेऊन त्यासाठीचा आढावा घेतला. बैठकीत बहुतांश कुलगुरूंनी विद्यार्थ्यांसोबत शिक्षक, प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची चिंता व्यक्त करत विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण हे ऑनलाईनच सुरू ठेवणे हिताचे ठरेल, असे मत मांडल्याचे अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले. दरम्यान, या बैठकीनंतर सामंत यांनी आपण प्रत्येक जिल्ह्याचा आढावा या बैठकीत घेतल्याचे सांगत यासंदर्भात बुधवारी (ता. ५) दुपारी चार वाजता आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठीची माहिती सामंत यांनी एका ट्विटद्वारे करून दिली. -- यावर निर्णय होण्याची शक्यता मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असून तातडीने वरिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू केले जाईल. काही विद्यापीठांच्या हिवाळी अणि इतर सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. त्यालाही इतर पर्याय देण्याचे आदेश होण्याची शक्यता आहे. मुंबई विद्यापीठ तसेच उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व वसतिगृहांवरही निर्बंध घातले जाण्याची शक्यता अधिकारी सूत्राकडून वर्तवली जात आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top