शहरातील गर्भवती महिलांना साह्य
गुजराती सेवा समाजाचा उपक्रम
मुंबई, ता. ५ ः मुंबई गुजराती सेवा समाजातर्फे शहरातील गर्भवती महिलांसाठी जीवनसत्त्वे, औषधे, स्त्री-रोगतज्ज्ञांचा व आहारतज्ज्ञांचा सल्ला, गर्भसंस्कार व योगाभ्यास प्रशिक्षण, अशा प्रकारे निःशुल्क साह्य करण्यात येणार आहे.
आचार्य पवन त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारपासून (ता. १०) हा कार्यक्रम सुरू होईल. यात गर्भवती महिलांना जीवनसत्त्वाच्या गोळ्या, प्रोटीन पावडर, अँटी स्ट्रेचमार्क क्रीम, तसेच अन्य अत्यावश्यक बाबी दिल्या जातील, अशी माहिती सेवा समाजाचे संस्थापक व मुंबई भाजप सचिव बिमल भुता यांनी दिली.
गर्भवती महिलांना निर्मल गुजराथी व रश्मी फडणवीस या स्त्री-रोगतज्ज्ञांचा विनामूल्य सल्लाही मिळेल. तसेच आहारतज्ज्ञ अवनी मेहता यांच्यामार्फत वैयक्तिक डाएट प्लानही दिले जातील. तसेच प्राची गोराडिया यांची निःशुल्क गर्भसंस्कार प्रशिक्षण व्याख्याने, तसेच गर्भवती महिलांसाठी योगाभ्यास वर्गही घेतले जातील.
...
येथे संपर्क करा
कोविडमधून सावरलेल्या व्यक्तींचे विवाहसोहळे समाजातर्फे आयोजित करून त्यांना संसारोपयोगी साहित्यही दिले जाते. समाजाने विलेपार्ले येथे ऑक्सिजन काँसन्ट्रेटर बँकही सुरू केली असून रुग्णालयांना व्हेंटीलेटरही दान केले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने कोविड रुग्णांना स्पायरोमीटरही दिले जातात. तसेच कोविडमुळे माता-पित्याचे छत्र गमावलेल्या विद्यार्थ्यांना अर्थसाह्यही केले जाते. अधिक माहितीसाठी संपर्क नीलेश गालिया ९३७२४८९९५९, तुषार कटरेचा ९८३३४८१२३८ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
...