जिल्ह्यात २० हजार ३२६ खाटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात २० हजार ३२६ खाटा
जिल्ह्यात २० हजार ३२६ खाटा

जिल्ह्यात २० हजार ३२६ खाटा

sakal_logo
By
जिल्ह्यात २० हजार ३२६ खाटा तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासन सज्ज सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ५ ः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात सध्या सुमारे २० हजार ३२६ खाटा उपलब्ध असून त्यापैकी ९०४४ ऑक्सिजन खाटा आहेत. एप्रिल २०२१ मध्ये आढळून आलेल्या जिल्ह्यातील एका दिवसाची सर्वोच्च रुग्णसंख्या लक्षात घेऊन त्याच्या तीनपट ऑक्सिजनची उपलब्धता करण्याचे नियोजन सुरू असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील उपचारांच्या सुविधांनुसार सीसीसीमध्ये ६८२५, डीसीएचसीमध्ये ६९२८, डीसीएचमध्ये ६५७३ अशा एकूण २० हजार ३२६ रुग्णांसाठी खाटांची उपलब्धता आहे. त्यामध्ये विलगीकरणासाठी ८४९०, ऑक्सिजनची सोय असलेल्या ९०४४, अतिदक्षता विभागातील २७९२ खाटांचा समावेश आहे. ३ जानेवारीच्या अहवालानुसार ठाणे जिल्ह्याचा पॉझिव्हिटी दर हा सुमारे ७.४५ टक्के असून रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे आठ लाख ९१ हजार ४८७ एवढ्या चाचण्या केल्या जात आहेत. जिल्ह्यात सहा हजार ३१८ सक्रिय रुग्ण असून त्यापैकी ९०० रुग्ण सीसीसीमध्ये, २४९ रुग्ण डीसीएचसीमध्ये, ४६४ रुग्ण डीसीएचमध्ये उपचार घेत असून सुमारे तीन हजार ३९६ रुग्ण गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. ३४४ रुग्ण ऑक्सिजनवर असून २६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. ठाणे जिल्ह्यात २४ एप्रिल २०२१ रोजी एकाच दिवशी सर्वाधिक ८३ हजार सक्रिय रुग्णसंख्या होती. त्याला २१९ मेट्रिक ऑक्सिजनची आवश्यकता होती. आता तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी या संख्येच्या तीनपट म्हणजे ६५७ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्धतेसाठी नियोजन केले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी अद्याप आपला पहिला अथवा दुसरा डोस घेतला नसेल त्यांनी त्वरित घ्यावा. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, हात धुणे या कोरोना त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून उपचारांच्या सुविधेसोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरदेखील भर दिला जात आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दृष्टिक्षेपात उपलब्ध खाटा- २० हजार ३२६ ऑक्सिजन खाटा- ९०४४ उपलब्ध ऑक्सिजन साठा नियोजन - ६५७ मेट्रिक टन व्हेंटिलेटरवर रुग्ण - २६
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top