परळ स्थानकाबाहेर ईव्ही चार्जिंग सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परळ स्थानकाबाहेर ईव्ही चार्जिंग सुविधा
परळ स्थानकाबाहेर ईव्ही चार्जिंग सुविधा

परळ स्थानकाबाहेर ईव्ही चार्जिंग सुविधा

sakal_logo
By
परळ स्थानकाबाहेर ईव्ही चार्जिंग सुविधा मुंबई, ता. ५ : मध्य रेल्वेच्या परळ स्थानकात सार्वजनिक ईव्ही चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या चार्जिंग स्टेशनचे उद्‍घाटन महाराष्ट्राचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या उपक्रमामुळे हरित धोरणाला बळकटी दिली जात असल्याचे यावेळी देसाई यांनी सांगितले. मजेंटा या कंपनीतर्फे ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लवकरच दादर आणि भायखळा या दोन स्थानकांमध्येही ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. याप्रसंगी महावीर लुनावत, किरण पटेल, मॅक्सन लुईस, पल्लवी पटेल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. भारतीय बनावटीच्या तंत्रज्ञानाच्या आधारे पथदिव्यांशी संलग्न असलेले हे ईव्ही चार्जिंग स्टेशन (चार्जग्रीड फ्लेअर) चोवीस तास चालणार आहे. हे चार्जर स्टेशन चार्जग्रीड अॅपद्वारे नियंत्रित केले जाईल. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top