तेवीस पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या
Sakal

तेवीस पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी, ता. ९ : पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयातील बारा पोलिस निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक व नऊ उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी काढले आहेत. यामध्ये निगडी पोलिस ठाण्यातील ओटास्कीम भागासाठी स्वतंत्र पोलिस निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. तर, सहायक पोलिस आयुक्तपदी बढती मिळालेले सतीश माने यांच्याकडे प्रशासन व विशेष शाखेची जबाबदारी दिली आहे.
अधिकाऱ्याचे नाव - कंसात सध्याचे ठिकाण व बदली झालेले ठिकाण.
पोलिस निरीक्षक रावसाहेब बापूराव जाधव (देहूरोड पोलिस ठाणे ते पोलिस कल्याण शाखा), रंगनाथ उंडे (नियंत्रण कक्ष ते पिंपरी वाहतूक विभाग), डॉ. अमरनाथ वाघमोडे (नियंत्रण कक्ष ते तळवडे वाहतूक शाखा), विजया कारंडे (नियंत्रण कक्ष ते निगडी वाहतूक शाखा), शंकर डामसे (नियंत्रण कक्ष ते निगडी पोलिस ठाणे-ओटा स्कीम), सुनील पिंजण (नियंत्रण कक्ष ते शस्त्र विरोधी पथक), वर्षाराणी पाटील (नियंत्रण कक्ष ते देहूरोड पोलिस ठाणे), ज्ञानेश्वर काटकर (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा युनिट १), मच्छिंद्र पंडित (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा युनिट ४) , प्रसाद गोकुळे (गुन्हे शाखा युनिट ४ ते एमओबी/पीसीबी) , राजेंद्र बर्गे (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलिस ठाणे), मनोज खंडाळे (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा).
तसेच सहायक निरीक्षक गणेश पवार (पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा वाचक ते आर्थिक गुन्हे शाखा), अंबरीश देशमुख (गुन्हे शाखा युनिट ४ ते शस्त्र विरोधी पथक), पोलिस उपनिरीक्षक तुकाराम शेळके (नियंत्रण कक्ष ते पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा यांचे वाचक), महेश मुळीक (नियंत्रण कक्ष ते चिखली ठाणे), श्रीनिवास दराडे (नियंत्रण कक्ष ते सांगवी ठाणे), स्वप्नील वाघ (नियंत्रण कक्ष ते चिखली ठाणे ), शरद शिंपणे (नियंत्रण कक्ष ते तळेगाव-दाभाडे), पौर्णिमा कदम (नियंत्रण कक्ष ते भोसरी-एमआयडीसी), प्रशांत रेळेकर (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा (एटीसी पथक), बाळासाहेब आढारी (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा), संतोष लांडे (नियंत्रण कक्ष ते चाकण ठाणे ). निगडी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या ओटास्किम या भागात वारंवार गुन्हेगारी घटना घडत असतात. यामुळे अनेकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. दरम्यान, येथील गुन्हेगारी घटना रोखण्यासह कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी या भागासाठी स्वतंत्र पोलिस निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे.
------------------------
शस्त्र विरोधी पथक स्थापन

पिस्तूल, तलवार, कोयता यासह विविध शस्त्र बाळगणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहेत. गोळीबारसह विविध हत्याराने खून, प्राणघातक हल्ला अशा घटनांची दरदिवशी पोलिस दफ्तरी नोंद होत आहे. दरम्यान, बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेण्यासह त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत स्वतंत्र शस्त्र विरोधी पथक स्थापन केले असून, स्वतंत्र पोलिस निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. लवकरच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली जाणार आहे.

---------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com