कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवले
कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवले

कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवले

sakal_logo
By
कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवले पाच खासगी प्रयोगशाळांची मदत घेणार सकाळ वृत्तसेवा नवी मुंबई, ता. ५ : शहरातील कोविडबाधित रुग्णांना वेळीच शोधून काढण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. शहरातील कोविड चाचण्या पूर्वीपेक्षा दुप्पटीने वाढवण्यात आल्या आहेत. सध्या सरासरी १४ हजार कोविड चाचण्या केल्या जात आहेत. मंगळवारी, ५ डिसेंबरला १५ हजार पेक्षा जास्त कोविड चाचण्या करण्यात आल्या. जास्तीत नागरिकांच्या चाचण्या करण्यासाठी महापालिकेच्या स्वतःच्या प्रयोगशाळेसोबत आणखीन पाच खासगी प्रयोगशाळांचे सहकार्य घेतले जात आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेला वेगात सुरुवात झाली आहे. डिसेंबर २०२१ पासून नवी मुंबई शहरात कोविडच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ होऊ लागली आहे. नवी मुंबईत सद्या ३ हजार ४०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या निर्बंधांमध्ये शिथिलता असल्याने सार्वजनिक जागांवर फिरणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. तसेच परदेशातून आलेल्या व्यक्तींमुळे शहरात ओमिक्रॉन व्हेरिएन्टच्या समूह संसर्गालाही सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत एका व्यक्तीपासून अनेकांना संसर्ग होऊन साखळी तयार होण्याची दाट शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेता कोविड चाचण्यांवर आरोग्य विभागातर्फे भर दिला जात आहे. महापालिकेतर्फे रेल्वे स्थानके, बस डेपो, नागरी आरोग्य केंद्रे, रुग्णालयांमध्ये चाचणी केली जात आहे. तसेच जे नागरिक केंद्रांपर्यंत पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी मोबाईल व्हॅनद्वारे कोविड चाचण्या केल्या जात आहेत. ---------------------------- खासगी प्रयोगशाळांचा आधार नवी मुंबई महापालिकेच्या अद्ययावत प्रयोगशाळेत दिवसाला पाच हजार चाचण्याचे नमुने तपासले जातात. परंतु सद्या शहरात दिवसाला १४ हजार पेक्षा जास्त चाचण्या केल्या जात आहेत. त्याकरिता महापालिकेने पाच खाजगी प्रयोगशाळा निवडल्या आहेत. महापालिकेतील पाच हजारांनतरच्या चाचण्या करण्यासाठी दहा हजार नमुने विविध प्रयोगशाळांमध्ये चाचण्यांसाठी पाठवले जात आहेत. ---------------------------- तर बाजारपेठा आणि मॉल बंद करणार नवी मुंबई शहरला कोविडच्या दोन्ही लाटेचा तडाखा बसला आहे. यापैकी दुसऱ्या लाटेत आलेले १४४३ हा रुग्ण सापडल्याचा विक्रमी आकडा आहे. गेल्यावर्षी ४ एप्रिलला एवढ्या उच्चांकी रुग्णांची नोंद महापालिकेत झाली होती. परंतु आताचे रुग्णवाढीचा वेग पाहता नवे रुग्ण सापडण्याच्या सत्रात २ हजार रुग्णांचा आकडा पार केल्यावर महापालिकेतर्फे सर्व बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे आणि मॉल बंद करण्याबाबत विचार केला जाईल असे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. ------------------------------- चाचण्यांचे वाढते प्रमाण १ जानेवारी - १२,३४८ २ जानेवारी - १०२२४, ३ जानेवारी - १४०५१, ४ जानेवारी - १५३५० २८ डिसेंबर - ७०१५, २९ डिसेंबर - ८९३६, ३० डिसेंबर - ८८८५, ३१ डिसेंबर - ९९०६
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top