वाहतुकीच्या नव्या दंडामुळे वाहनचालकांना जरब

वाहतुकीच्या नव्या दंडामुळे वाहनचालकांना जरब

महिनाभरात चालकांकडून ५१ लाख ६८ हजारांचा दंड वसूल नवी मुंबई आरटीओकडून ७५९ जणांवर कारवाई; वाशी, ता. ६ (बातमीदार) ः वाहतूक विभागाकडून चालकांसाठी आता नवीन दंड नियमावली लागू करण्यात आली असून दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ केली आहे. त्‍यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त चालकांना आता जरब बसणार आहे शिवाय त्‍यांच्याकडून भरमसाट दंड वसुलीची तरतूद करण्यात येत आहे. महिनाभरात नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ७५९ वाहनचालकांवर नव्या दंडानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार ५१ लाख ६८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार १३० वाहनचालकांचे परवाने आरटीओकडून रद्‌द करण्यात आले आहेत. केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत. नव्या कायद्यानुसार, वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास दुचाकीस्वारांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. तर चार चाकी वाहनचालकांना दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. एवढंच नाही तर तीन वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. परवाना नसताना गाडी चालविणाऱ्यांना आधी ५०० रुपये दंड होता. आता दंडात वाढ होऊन ५ हजार रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे महिनाभरात नव्या वाहतूक नियमांनुसार कारवाई सुरू करण्यात आल्यामुळे वाहनचालकांना चांगलाचा जरब बसला आहे. महिनाभरात आरटीओने ७५९ वाहनचालकांवर कारवाई केली आहे. त्यामुळे वाहन चालकांकडूनही आता नियम पाळण्यावर भर दिला जात आहे. दुसऱ्यांदा गुन्हा केल्‍यास १०,००० रु. दंड वाहतुकीचे नियम मोडून बेशिस्तीने वाहन चालविल्यास दुचाकीस्वाराला १,००० रुपये, तर चारचाकी चालकाला ३,००० रुपये आणि अन्य वाहनांच्या चालकाला ४,००० रुपये दंड आकारण्यात येत आहे. यापूर्वी दंडाची रक्कम ५०० रुपये होती. तीन वर्षांत दुसऱ्यांदा गुन्हा घडल्यास १०,००० रुपये दंड करण्यात येत आहे. विना परवाना गाडीस ५००० रु. दंड १६ वर्षांखालील एखादी व्यक्ती पनवाना नसताना गाडी चालवत असेल, तर आधी ५०० रु. दंड होता, जो आता ५,०००रुपये झाला आहे. तसेच, विना वैद्यवाहन नोंदणीसाठी आधी १,००० हजार रुपये होता. जो आता पहिल्या वेळेस २,००० आणि दुसऱ्या वेळेस ५,००० इतका करण्यात आला आहे. अशाच प्रकारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर जरब बसवण्यासाठी इतर दंडाच्या रकमेमध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे. मोटार वाहन अनिधिनयम २०१९ ची अंमलबजावणी सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार दंडही आकारण्यात येत आहे. महिनाभरात नव्या दंडानुसार ७५९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर १३० वाहनचालकांचे परवाना तीन महिन्यासाठी रद्द करण्यात आला आहे. - हेमांगिनी पाटील, अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन ................. गतवर्षात चार कोटी २३ लाखांचा दंड वसूल बेशिस्त वाहनचांलकावर आरटीओची कारवाई वाशी, ता. ६ (बातमीदार) ः प्रवाशांशी अरेरावीपणे वागणे, अतिरिक्त भाडे आकारणे, भाडे नेण्यास नकार, जादा प्रवासी वाहतूक, सीट बेल्ट न वापरणे, अवैध प्रवाशी वाहतूक, मोबाईलवर बोलणे आदी वाहतुकीचे नियम मोडणार्‌यांवर आरटीओकडून वर्षभर कारवाई करण्यात येते. गतवर्षात जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत चार कोटी २३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत एक कोटी २२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने वाहतूक कमी प्रमाणात झाल्याने कारवाई कमी झाली होती. मात्र गतवर्षात मोठ्या प्रमाणात कारवाई केल्‍याने दंड वसुलीही वाढली आहे. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहनच्या हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारी तसेच मेल, लेखी तक्रारी, विशेष पथकांकडून केलेल्‍या कारवाईतून चार कोटी २३ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्‍याची माहिती उपप्रादेशिक परिवन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com