महामार्गावर अपघातात दोघे जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावर अपघातात दोघे जखमी
महामार्गावर अपघातात दोघे जखमी

महामार्गावर अपघातात दोघे जखमी

sakal_logo
By
महामार्गावर अपघातात दोघे जखमी पोलादपूर (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चांढवे, गणेशवाडी हद्दीत इनोव्हा कार आणि मोटरसायकलचा अपघात झाला. मधुकर येरुणकर हे मोटारसायकलवरून सुमित्रा येरुणकर यांना लोहारमाळ येथे रुग्णालयात घेऊन जात होते. त्या वेळेस गणेशवाडी येथील रस्त्यावरून महामार्गावर मोटरसायकल घेऊन जात असताना इंडिकेटर चालू करून रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने नाहीत, याची खात्री करत मोटरसायकल मुख्य रस्त्यावर आणली. त्याच वेळी भरधाव येणाऱ्या कारने मागून धडक दिल्याने अपघात झाला. महाड एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top