अनधिकृत बांधकामावर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत बांधकामावर कारवाई
अनधिकृत बांधकामावर कारवाई

अनधिकृत बांधकामावर कारवाई

sakal_logo
By
अनधिकृत बांधकामांवर कारवाई तुर्भे, ता. ६ (बातमीदार) : वाशी विभागातील सेक्टर ३० ए, इनॉर्बिट मॉलमागील मोकळ्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या झोपड्या, अतिक्रमण केलेले गाळे यांच्यावर नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. वाशी विभाग कार्यालयामार्फत धडक मोहिमेत अधिकारी, कर्मचारी, १५ मजूर आणि एक जेसीबीच्या साह्याने भंगार निष्कासित करण्यात आले. वाशी सेक्टर २८ येथील भूखंड १७ वरील कॉम्बो जम्बो इमारतीच्या तळमजल्यावर महापालिकेची परवानगी न घेता बांधकाम करण्यात आले होते. या अनधिकृत बांधकामास वाशी विभागातर्फे नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही बांधकाम न हटविल्याने तोडक कारवाई करण्यात आली.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top