एशियाटिक सोसायटीला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा द्या
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची लोकसभेत मागणी
मंबई, ता. ६ ः मुंबईच्या एशियाटिक सोसायटीला कोलकातामधील एशियाटिक सोसायटीप्रमाणेच राष्ट्रीय संस्थेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेमध्ये केली. मुंबईतील वैभवशाली इतिहास असलेली एशियाटिक सोसायटी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक टंचाईचा सामना करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी केलेली मागणी दिलासा देणारी आहे.
एशियाटिक सोसायटीचे महत्त्व अरविंद सावंत यांनी ही मागणी करताना स्पष्ट केले. हे केवळ ग्रंथालय नसून मुंबईचे वैभव आहे. या ग्रंथालयात मोठ्या प्रमाणावर ग्रंथसंपदा आहेच, शिवाय बहुमूल्य अशी हस्तलिखिते आहेत. संस्कृत, अरबी, पाली, पर्शियन या भाषांमधील ताडपत्रावरील लिखिते सोसायटीच्या संग्रहालयात आहेत. गुप्तकालीन आणि मुघलकालीन सोन्याच्या नाण्यांबरोबरच बारा हजार विविध दुर्मिळ नाण्यांचा संग्रह सोसायटीमध्ये असल्याचेही सावंत यांनी सांगितले. बौद्धकालीन दुर्मिळ वस्तू आणि कलाकृती पाहण्यासाठी जगभरातील अभ्यासक एशियाटिक सोसायटीला भेट देत असतात.
...
४५ टक्के वेतन
एशियाटिक सोसायटीच्या अभिमानास्पद कामगिरीमध्ये येथील कर्मचाऱ्यांचा वाटा मोलाचा आहे. आर्थिक टंचाईमुळे या कामगारांना पूर्ण वेतन देण्यासाठी सोसायटी असमर्थ आहे. त्यांना फक्त ४५ टक्के वेतन मिळत आहे. २१७ वर्षांचा इतिहास असलेल्या या सोसायटीला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा मिळाल्यास या सर्व समस्या दूर होतील, असेही सावंत यांनी म्हटले आहे.
...