आरपीएफने ६०१ प्रवाशांचे प्राण वाचविले

आरपीएफने ६०१ प्रवाशांचे प्राण वाचविले

आरपीएफने वाचवले ६०१ प्रवाशांचे प्राण ‘मिशन जीवन रक्षा’अंतर्गत कामगिरी सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ६ : आयुष्याला कंटाळून अनेक व्यक्ती शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्या करतात. धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या करण्यासाठी अनेक जण प्रवृत्त होतात; मात्र कर्तव्यावर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांनी रेल्वे रुळावर उडी घेऊन धावत्या रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींचे प्राण वाचवले आहेत. ‘मिशन जीवन रक्षा’अंतर्गत २०२१ या वर्षात आरपीएफने अशा ६०१ प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. मागील चार वर्षांपासून आरपीएफद्वारे मिशन जीवन रक्षाद्वारे एक हजार ६५० व्यक्तींना जीवनदान दिले. त्यामुळे राष्ट्रपतींनी आरपीएफ जवानांना नऊ जीवनरक्षा पदके आणि एक वीरता पदक देऊन सन्मानित केले. रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण करणे, प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, प्रवाशांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी आरपीएफ कार्यरत आहे. यासह रेल्वेच्या मालमत्तेसंबंधी गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी उपाययोजना करून देशभरात पसरलेल्या रेल्वेच्या मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहे. २०२१ वर्षात आरपीएफने ५२२ ऑक्सिजन विशेष गाड्या मूळ स्थानकापासून गंतव्य स्थानापर्यंत सुरक्षितरीत्या नेल्या. कोविड हेल्प बुथ प्रमुख स्थानकांवर सुरू केले होते. ज्यांनी अनेक स्रोतांकडून सत्यापित माहिती मिळवली आणि गरजूंना त्वरित मदत देण्याव्यतिरिक्त कोविड संसाधनांच्या उपलब्धतेबद्दल माहिती दिली. ... ‘मेरी सहेली’द्वारे महिलांची सुरक्षा लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये एकटी महिला प्रवास करत असल्यास त्या महिलेला सुरक्षा प्रदान करण्यासाठी ‘मेरी सहेली’ मोहीम सुरू केली आहे. आरपीएफने याद्वारे भारतीय रेल्वेच्या प्रमुख रेल्वे स्थानकांत २४४ मेरी सहेली दलाची स्थापना केली आहे. यासह ८४० रेल्वे स्थानकांवर आणि चार हजार रेल्वे डब्यांत सीसीटीव्ही प्रणाली लावली आहे. महिला विशेष उपनगरीय लोकल सुरू करण्यात आली आहे. ... लहान मुलांची घरवापसी घर सोडून पळून गेलेल्या, हरवलल्या आणि रेल्वे स्थानकांत विनापालक दिसून आलेल्या लहान मुलांची घरवापसी करण्यात आली आहे. २०२१ या वर्षात ११ हजार ९०० हून अधिक लहान मुलांची घरवापसी आरपीएफने केली आहे. यासह संपूर्ण देशात एकूण १३२ चाईल्ड हेल्प डेस्क सुरू करण्यात आले आहेत. ... मानवी तस्करी महिला आणि पुरुषांचे अपहरण करून तस्करी करण्याचे प्रमाण देशात अधिक आहे. रेल्वे विभागात अशी तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत. २०२१ वर्षात आरपीएफने एकूण ६३० व्यक्तींचा तस्करी होण्यापासून बचाव केला आहे. यात ५४ महिला, ९४ अल्पवयीन मुली, ८१ पुरुष, ४०१ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ... - २०२१ मध्ये कर्तव्यावर असताना कोविड संसर्गामुळे देशभरातील २६ आरपीएफ जवानांचा मृत्यू झाला. - रेल्वे परिसरातील एकूण ५.८३ कोटी रुपयांची रेल्वेची संपत्ती चोरी करणाऱ्या आठ हजार ७४४ आरोपींना पकडण्यात आरपीएफला यश आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com