गोवंडीत गोळीबारप्रकरणी तिघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवंडीत गोळीबारप्रकरणी तिघांना अटक
गोवंडीत गोळीबारप्रकरणी तिघांना अटक

गोवंडीत गोळीबारप्रकरणी तिघांना अटक

sakal_logo
By
गोवंडीत गोळीबारप्रकरणी तिघांना अटक मानखुर्द (बातमीदार) : गोवंडीच्या झाकिर हुसेननगर परिसरात बुधवारी (ता. ५) रात्री झालेल्या प्राणघातक हल्ल्यात युनूस खान (४५) व इस्माईल खान (४१) हे दोघे भाऊ किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुबाब सय्यद (२३), चांद शेख (२२) यांनी साथीदारांसह तलवारीच्या सहाय्याने हल्ला केला, तसेच बंदुकीतून गोळीबारही केला. युनूस खान यांचा मुलगा सैफ याने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवून देवनार पोलिसांनी रुबाब, चांद तसेच एका महिलेला अटक केली आहे. परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळक्याने खान यांच्याकडे हप्ता मागीतला होता. तो देण्यास खान यांनी नकार दिला होता; तसेच देवनार पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या रागातून रात्री साडेनऊच्या सुमारास या टोळक्याने युनूस खान यांच्यावर गोळीबार केला होता.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top