नवी मुंबईत कोव्हीड रुग्णांचा विक्रमी उच्चांक

नवी मुंबईत कोव्हीड रुग्णांचा विक्रमी उच्चांक

नवी मुंबईत कोविड रुग्णांचा विक्रमी उच्चांक दोन्ही लाटेतील रुग्णांचा विक्रम मोडीत; २१५१ नव्या रुग्णांची नोंद सकाळ वृत्तसेवा नवी मुंबई, ता. ६ : नवी मुंबई शहरात आज सापडलेल्या कोविडच्या नव्या रुग्णांच्या आकड्याने दोन्ही लाटेत सापडलेल्या रुग्णांचा विक्रम मोडीत काढला. आज दिवसभरात तब्बल २ हजार १५१ नव्या रुग्णांची नोंद झाली. कोविड रुग्णांचा आज शहरात प्रचंड उद्रेक झाल्याने महापालिका प्रशासन हादरले आहे. नवी मुंबईत गेल्या वर्षी दुसऱ्या कोविडच्या लाटेत १४०४ रुग्णांची नोंद झाली. ४ एप्रिलला या विक्रमी आकड्याची नोंद झाली होती. त्यानंतर दुसऱ्या लाटेत एवढ्या रुग्णांची नोंद झाली नाही. मात्र डिसेंबर महिन्यापासून शहरात झपाट्याने रुग्णवाढ सुरू झाली आहे. ५ डिसेंबरला नवी मुंबई १३२४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर शहरातील कोविड चाचण्या वाढवण्यात आल्या. आज दिवसभरात सुमारे १५ हजारपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज २ हजार १५१ रुग्णांची नोंद झाली. आज दिवसभरात ५७३३ रुग्णांची आरटीपीसीआर आणि ७३८० रुग्णांची रॅपिड अँटिजेन चाचण्या केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com