दोघांना आठ वर्षे सक्तमजुरी

दोघांना आठ वर्षे सक्तमजुरी

इसिससाठी चिथावल्याप्रकरणी दोघांना आठ वर्षे सक्तमजुरी विशेष एनआयए न्यायालयात सुनावणी सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ७ : इसिस या अतिरेकी संघटनेत सामील होण्यासाठी युवकांना चिथावल्याप्रकरणी मालवणीतील दोन तरुणांना विशेष न्यायालयाने आज आठ वर्षे सक्तमजुरीची सजा सुनावली. रिझवान अहमद (२५) आणि मोहसीन सय्यद (३२) यांना विशेष एनआयए न्यायालयाचे न्या. ए. टी. वानखेडे यांनी बुधवारी (ता. ५) दोषी घोषित केले होते. दोन्ही आरोपी मागील सहा वर्षांपासून कारागृहात आहेत. त्यांच्यावर २०१८ मध्ये आरोप निश्‍चित करण्यात आले होते. आम्हाला आमच्या कृत्याचा पश्चाताप होत असून पुन्हा समाजात सामील व्हायचे आहे, असा युक्तिवाद दोघांच्या वतीने करण्यात आला होता. दोघेही प्रत्यक्ष कोणत्याही हिंसाचारामध्ये सहभागी नव्हते, त्यामुळे त्यांना सुधारण्याची संधी द्यावी, अशी विनंती आरोपींचे वकील ॲड. ए. आर. बुखारी यांनी केली होती. मात्र विशेष सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांनी विनंती फेटाळून लावली. त्यांनी ३९ साक्षीदारांचा जबाब नोंदविला. इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी युवकांना प्रभावित करण्याचा गुन्हा आरोपींनी केला आहे, असा आरोप अभियोग पक्षाने केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com