कांदिवलीत सीबीएसई शाळा सुरू करण्याची मनसेची मागणी
मालाड, ता. ८ (बातमीदार) ः महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे कांदिवली बंदरपखाडी येथील पालिका शाळेच्या इमारतीमध्ये सीबीएसई शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महापालिक आर दक्षिण विभागातील कांदिवली (प) बंदरपखाडी येथे २०१९ मध्ये पालिकेची शाळा बांधण्यात आली होती. शाळेला मुंबई पब्लिक स्कूल नावही देण्यात आले; पण शिक्षण विभागाने जेव्हा २०२१ मध्ये नवीन सुरू केलेल्या मुंबई पब्लिक स्कूल सी.बी.एस.ई. आणि आय.सी.एस.ई. शाळांच्या यादीमध्ये बंदरपखाडी येथील शाळेचे नाव नाही. कांदिवली सह्याद्रीनगर, बंदरपखाडी येथील परिसरात २ ते ३ लाखांची लोकसंख्या असून विभागात जास्तीत जास्त मध्यमवर्गीय राहत आहेत. याचा विचार करून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चारकोप विधानसभेचे विभाग अध्यक्ष रोहित श्यामसुंदर दंडवते यांनी पुढाकर घेऊन स्थानिक रहिवाशांच्या मुलांना लाभ मिळण्यासाठी पालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांची करी रोड येथील कार्यालयात भेट घेऊन सी.बी.एस.ई. शाळा सुरू करण्याबाबत निवेदन दिले. यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राजेश कंकाळ यांनी शिष्टमंडळास दिले.
...