मुंबईची स्पेशल पाव भाजी चित्रपट प्रदर्शित

मुंबईची स्पेशल पाव भाजी चित्रपट प्रदर्शित

‘मुंबई स्पेशल पाव भाजी’ चित्रपट प्रदर्शित अमली पदार्थांची तस्करी आणि मानवी तस्करी या मुंबईच्या अंधारलेल्या आणि भयंकर अंडरवर्ल्डवर बेतलेला चित्रपट म्हणजे ‘मुंबई स्पेशल पावभाजी.’ हा क्राईम थ्रिलर चित्रपट शेमारूमी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट काही चित्रपट महोत्सवांमध्ये गौरविला गेला आहे. मुंबईतील रात्रीची होणारी उलाढाल तसेच येथील अंडरवर्ल्ड यावर प्रकाश या चित्रपटात टाकण्यात आला आहे. ही कथा प्रेम (अभिषेक सेठिया) या तरुण अनाथ मुलाभोवती फिरणारी आहे. अशोक आर. कोंडके दिग्दर्शित या चित्रपटात ईशान शंकर, अभिषेक सेठिया, इब्रा खान, कृतिका तुळसकर, गौरी शंकर सिंग आदी कलाकारांनी काम केले आहे. अभिनेता अभिषेक सेठिया म्हणाला, ‘मुंबईच्या रस्त्यांवर शूटिंग करणं हा एक वेगळा अनुभव होता. मला या चित्रपटात काम करताना खूप आनंद झाला. विशेषत: संपूर्ण क्रूने खूप पाठिंबा दिला होता. मुंबईतील खऱ्या लोकेशन्सवर चित्रित केलेला हा चित्रपट प्रेक्षकांना अॅक्शन आणि इमोशनच्या रोलरकोस्टर राईडमधून घेऊन जाणारा असाच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com