भिवंडीत चोरट्याने केले युवकांच्या अंगावर ब्लेडचे वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत चोरट्याने 
केले युवकांच्या अंगावर ब्लेडचे वार
भिवंडीत चोरट्याने केले युवकांच्या अंगावर ब्लेडचे वार

भिवंडीत चोरट्याने केले युवकांच्या अंगावर ब्लेडचे वार

sakal_logo
By
चोरट्याचे युवकावर ब्लेडने वार भिवंडी, ता. ८ (बातमीदार) ः शहरातील पद्मानगर येथे मध्यरात्रीच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका चोरट्यास अडवल्याने त्याने रागाच्या भरात एका तरुणावर धारदार ब्लेडने वार करून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश भोया (वय ३५, रा. पुंडलिक चाळ, पद्मानगर) असे गंभीर जखमी रुग्णाचे नाव आहे; तर शाहरूख खान (वय २०, रा. समदनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी पद्मानगर येथे शिनू टेलर यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसण्याचा प्रयत्न करत असताना सुरेश भोया यांनी आरोपीस जाब विचारला. त्या रागातून आरोपीने धारदार ब्लेडने सुरेश यांच्या छातीवर, पोटावर वार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी जखमीच्या मदतीला धावलेल्या शिनू टेलर यांच्या दोन मुलींना आणि इतरांना हातातील ब्लेड दाखवत धमकावले. यानंतर नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. पोलिस उपनिरीक्षक एस. एल. भापकर हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top