पूरग्रस्त शेतकरी अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत मनसेने दिले तहसीलदारांना पत्र

पूरग्रस्त शेतकरी अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत मनसेने दिले तहसीलदारांना पत्र
Published on
भिवंडी तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी मनसेचा तहसीलदारांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा वज्रेश्वरी, ता. ८ (बातमीदार) : जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान पाहता तातडीने मदत जाहीर तर केली; मात्र आजतागायत ही मदत शेतकऱ्यांना न मिळाल्याने ही मदत ताबडतोब नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जावी, अशी मागणी मनविसेचे तालुकाध्यक्ष परेश चौधरी यांनी केली आहे. भिवंडीतील तालुका स्तरावरील सर्व मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांचे पंचनामे वेळेत पूर्ण करूनसुद्धा शासनाने केलेली नुकसानभरपाईची मदत शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोहोचली नाही. मागच्या महिन्यात तहसीलदारांनी पुरात मालमत्तेचे नुकसान झालेल्या लाभधारकांना भरपाईची मदत देऊ केली होती, पण बाधित शेतकऱ्यांपर्यंत अद्याप मदत पोहोचलेली नाही. याप्रश्नी शेतकऱ्यांकडून सातत्याने पक्षाकडे तक्रारी येत होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष परेश चौधरी यांनी तहसीलदारांना निवेदन देत शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची रक्कम मिळवून द्यावी अशी मागणी केली. तसेच येत्या सात दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये भरपाईची रक्कम वर्ग करण्यात यावी; अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी सूचना मनसेच्या शिष्टमंडळाद्वारे देण्यात आली. या शिष्टमंडळात तालुका उपाध्यक्ष हनुमान वारघडे, श्रीकांत गोने, प्रशांत गायकवाड, सिद्धार्थ खाणे, कुणाल अहिरे, तुषार खारेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MP naresh Mhaske and MP Shrikant Shinde
Anna Bansode
Local Trains Late Every Day Banner Near Kopar Station
csmt railway station
Marathi News Esakal
www.esakal.com