माहुल पम्पिंग भूखंड अदलाबदल
पालिकेचा ५०० कोटींचा जमीन घोटाळा ः योगेश सागर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : माहुल पम्पिंग स्टेशनसाठी पालिकेने खासगी विकसकांशी भूखंडाची अदलाबदल करण्याच्या निर्णयावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. या भूखंड अदलाबदलीत ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप करीत या प्रकरणात चौकशीची मागणी भाजप आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे. हे आरोप ठरवून करण्यात आले आहेत. ते सिद्ध करून दाखवा, असे आव्हान महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.
ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पाअंतर्गत पालिका माहुल येथे पम्पिंग स्टेशन उभारणार आहे. यासाठी खासगी विकसकाकडून भूखंड घेण्यात आला आहे. या मोबदल्यात पालिकेने विकसकाला जवळचा भूखंड दिला आहे. या अदलाबदलीवरून भाजपने यापूर्वीच संशय व्यक्त केला होता; तर आता योगेश सागर यांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी केली आहे.
...
आरोप काय?
खासगी विकसकाचा या भूखंडावर कोणतेही विकास काम होणार नव्हते. त्यामुळे हा भूखंड त्यासाठी कवडीमोल होता. मात्र, पालिकेने या भूखंडाच्या मोबदल्यात त्याला पर्यायी भूखंड दिला आहे. पालिकेने विकासकामांसाठी ताब्यात घेतलेले भूखंड दुसऱ्यांना देऊ शकत नाही. मग हा भूखंड पालिका कसा देणार नाही, असे प्रश्न सागर यांनी उपस्थित केले आहेत. यात सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोपही त्यांनी केला.
...