सीएनजी, पीएनजी पुन्हा महागला

सीएनजी, पीएनजी पुन्हा महागला

सीएनजी, पीएनजी पुन्हा महागला महामुंबई विभागात आजपासून दरवाढ लागू मुंबई, ता. ८ ः महानगर गॅसतर्फे पुरवल्या जाणाऱ्या पीएनजी व सीएनजीच्या दरात अनुक्रमे दीड व अडीच रुपये वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ महामुंबई विभागात रविवारी पहाटेपासून (ता. ९) लागू होईल. दरवाढीमुळे आता एक किलो सीएनजीची किंमत ६६ रुपये; तर एक घनमीटर पीएनजीची किंमत ३९.५० रुपये होईल. देशांतर्गत नैसर्गिक वायूची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महानगर गॅसला जादा बाजारभावाने नैसर्गिक वायू खरेदी करावा लागतो आहे. बाजारातील नैसर्गिक वायूच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने महानगर गॅसचा नैसर्गिक वायूखरेदीचा खर्चही पुष्कळ वाढला आहे. त्याची काहीशी भरपाई करण्यासाठी ही दरवाढ करणे भाग आहे. या दरवाढीनंतरही सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांचा प्रतिकिलोमीटर धावण्यामागील इंधन खर्च पेट्रोल व डिझेलच्या सध्याच्या दराच्या तुलनेत अनुक्रमे ५९ टक्के व ३० टक्के कमी राहील; तर इतर कंपन्यांच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या तुलनेत अजूनही महानगर गॅसचा पीएनजी नैसर्गिक वायू २२ टक्के स्वस्त आहे. त्याखेरीज तो वापरण्यासही सोपा व सोईस्कर आहे, असे महानगर गॅसतर्फे कळवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com