बहाडोली गावात बाल ग्रंथालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहाडोली गावात बाल ग्रंथालय
बहाडोली गावात बाल ग्रंथालय

बहाडोली गावात बाल ग्रंथालय

sakal_logo
By
बहाडोली गावात बाल ग्रंथालय वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न मनोर, ता.९ (बातमीदार) ः जांभूळ गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहाडोली गावात बाल साहित्य संपदेने संपन्न असलेले बाल ग्रंथालय बुधवारी (ता. ५) सुरू करण्यात आले. गावातील पाटील आळीत एका घराच्या ओटीवर प्रतिभा बाल ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, लायन्स क्लब आणि गावातील शिक्षकांच्या समूहाने बाल ग्रंथालयाची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. ग्रंथालयात मुबलक प्रमाणात बाल साहित्य उपलब्ध असल्याने बालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी मदत होणार आहे. शिक्षकांच्या उपक्रमावर पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रंथालयामार्फत विज्ञान, लहान मुलांच्या गोष्टी, कथा, मनोरंजनात्मक साहित्य, अवयव ओळख होणारे साहित्य, सामान्य ज्ञान आदी लहान मुलांच्या आकलनशक्तीला चालना देणारी पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. घरच्या घरी खेळीमेळीच्या वातावरणात मुलांना पुस्तके वाचायला मिळणार आहेत. त्यामुळे कंटाळून न जाता पहिलीपासून पुढच्या वर्गातील मुले पुस्तके आवडीने वाचन करतील. बालकांच्या हातात मोबाईल आल्याने वाचन संस्कृती लोप पावत असताना बालग्रंथालयाची संकल्पना बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रभावी ठरणार आहे. बाल ग्रंथालय आठवड्यातून दोन दिवस सुरू असणार आहे. गाव आणि पंचक्रोशीतील पहिली ते दहावीचे विद्यार्थी बाल ग्रंथालयातील पुस्तके वाचनासाठी नेऊ शकतात. विद्यार्थीच बाल ग्रंथालयाचे सदस्य असून बाल ग्रंथालय विद्यार्थ्यांकडून चालवले जाणार आहे. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य किरण सावे, लायन्स क्लब अध्यक्ष अतुल दांडेकर यांच्या हस्ते बाल ग्रंथालयाचा शुभारंभ केला गेला. यावेळी लायन्स क्लबचे पराग जोशी, भोगीलाल विरा, हितेंद्र शहा, बालग्रंथालय संकल्पनेचे शिक्षक प्रकाश चुरी, निखिल चुरी, वैभव कुडू, विवेक कुडू, आरती कुडू, दिलीप किणी, किरण पाटील आदी उपस्थित होते. विद्यार्थीच पाहणार कामकाज बहाडोली गावातील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी सुरवी संजय कडू ग्रंथालयाचे कामकाज पाहणार आहे. विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे व त्याची नोंद ठेवण्याचे काम करणार आहे. याचबरोबरीने बालवाचक वाढवण्यासाठीही तिच्यामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. याकामी गावातील सुशिक्षित तरुण व शिक्षक समूहाचे मार्गदर्शन तिला मिळणार आहे. प्रतिक्रिया मोबाईलच्या युगात बालमनावर वाचनसंस्कृतीचे ठसे उमटविण्यासाठी बाल ग्रंथालय संकल्पना प्रभावी ठरेल असा विश्वास आहे. - डॉ. किरण सावे, प्राचार्य, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय. गावातील सुशिक्षित पिढीने पुढची पिढी घडविण्यासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. बाल ग्रंथालयाद्वारे बालकांसाठी वाचन चळवळ उभी करण्याचा हा पहिला प्रयत्न असला तरी पुढे त्याचे रूपांतर सार्वजनिक ग्रंथालयात होईल, असा विश्वास आहे. - विवेक कुडू, प्राध्यापक.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top