अर्नाळ्यात गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्नाळ्यात गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्थ
अर्नाळ्यात गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्थ

अर्नाळ्यात गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्थ

sakal_logo
By
अर्नाळ्यात गावठी दारूचा अड्डा उध्वस्त नालासोपारा, ता. ९ (बातमीदार) : अर्नाळा गावच्या हद्दीत नवसागरमिश्रित गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी पूर्ण अड्डा उ‌ध्वस्त केला. या छाप्यात एक लाख ५० हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे कक्ष शाखा ३ चे प्रभारी निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने शनिवारी (ता. ८) ही कारवाई केली. अर्नाळा किल्ल्याच्या जेटीपासून १०० मीटर अंतरावर मोकळ्या जागेत गावठी हातभट्टी दारू काढली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्त पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद बडाख यांच्या पथकाने छापा टाकून एक लाख ५० हजार ७५० रुपये किमतीचे २०० लिटर क्षमतेचे २७ प्लास्टिक पिंप, पाच हजार ४०० लिटर नवसागरमिश्रित रसायन, ५२५ लिटर गावठी हातभट्टी दारूचे ३५ लिटर क्षमतेचे १५ प्लास्टिक कॅन यासह अन्य मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. या छाप्यात फरार झालेल्या पाच ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top