ना. म. जोशी विद्याभवनचे शिष्यवृत्तीत यश
२६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
माणगाव, ता. ९ (वार्ताहर) : गोरेगाव येथील माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या ना. म. जोशी विद्याभवन शाळेने स्पर्धा परीक्षेत यशाची परंपरा राखली आहे. पूर्व उच्च प्राथमिक १३, तर पूर्व माध्यमिक १३ असे एकूण २६ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केले आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत हंस दोशी याने २४४ गुण मिळवले. तो रायगड जिल्ह्यात सातवा आला. तर भूमिशा पातेरे, श्रेया महाजन, श्रावणी गोरेगावकर, तेजल गांधी, विवेक जाधव, रुद्र सुर्वे, समिक्षा सरदार, श्रावणी खडस, आर्या म्हापूसकर, विभा सुतार, प्रांजल सितकर, वैष्णवी जाधव, अशा १३ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. गणित व बुद्धीमत्ता विषयासाठी बी. एस. साळुंखे, इंग्रजी विषयासाठी एम. जी. सदाफुले, तर मराठी विषयासाठी जे. जे. सकपाळ या शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत असून अथर्व खोत २७० गुण प्राप्त करून रायगडमध्ये प्रथम, तर महाराष्ट्रात सातवा आला. सार्थक कडू जिल्ह्यात चौथा आला आहे. चंदन जंगम, अथर्व गावडे, अद्वैत सहश्रबुद्धे, सिद्धी घाडगे, वेदांत खैरे, श्रुष्टी सुतार, ऋतिक कासरेकर, अतिश कडू समृद्धी केंद्रे, सौरभ सुर्वे आणि गंधार डांगे आदींनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांना एस. एस. बिचुकले, एस. एस. पाटील, एस. एस. दोशी यांनी मार्गदर्शन केले. हे सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, मार्गदर्शक, शिक्षक, पालक यांचे संस्थेचे चेअरमन दिलीप शेट, सचिव एस. आर. मेथा, मुख्याध्यापक राजेंद्र पवार, उपमुख्याध्यापक व्ही. के. शहा, पर्यवेक्षक पी. एस. कदम, एल. एस. येलपले यांनी अभिनंदन केले.
----------------------------------------------
सवाद विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सन्मान
पोलादपूर (बातमीदार) : तालुक्यातील सवाद माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा आठवी माध्यमिक विद्यालय सवादचा श्रीनाथ उतेकर तालुक्यात प्रथम आणि जिल्ह्यात सातवा क्रमांकावर आला आहे. साक्षी खेडेकर तालुक्यात सहावी, तर जिल्ह्यात १५९ व्या क्रमांकावर आणि सेजल सहदेव लाड तालुक्यात सातवी, तर जिल्ह्यात १८९व्या क्रमांकावर आली आहे. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शालेय स्तरावर संस्थेचे कार्यवाह दत्तात्रेय तुकाराम उतेकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार समारंभ घेण्यात आला.