३४० विद्यार्थी लसवंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३४० विद्यार्थी लसवंत
३४० विद्यार्थी लसवंत

३४० विद्यार्थी लसवंत

sakal_logo
By
किन्हवली महाविद्यालयातील ३४० विद्यार्थी लसवंत किन्हवली (बातमीदार) : ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाचही तालुक्यांत लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. आज किन्हवली येथील शहा चंदूलाल सरूपचंद विद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयात लसीकरण सत्र राबवण्यात आले असून ३४० विद्यार्थी लसवंत झाले. किन्हवली आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जागृती खादे, आरोग्य सहायक एस. आर. बांगर, डी. जी. दवणे, आर. एच. हरड, नीलम सापळे, सीमा वेखंडे, भारती गुंड व आशा कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी विद्या प्रसारक मंडळाचे सचिव दत्तात्रेय करण, उपमुख्याध्यापक एच. ए. उबाळे, पर्यवेक्षक जी. टी. खकाळ, ज्येष्ठ शिक्षक, सांस्कृतिक प्रमुख गोपाळ वेखंडे, ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरण कार्यक्रम संपन्न झाला.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top