कोट्यवधींची फसवणूक करणारी टोळी उद्ध्वस्त

कोट्यवधींची फसवणूक करणारी टोळी उद्ध्वस्त
बनावट पावत्यांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक नवी मुंबई सीजीएसटीकडून टोळी उद्ध्वस्त नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : वस्तू वा मालाचा पुरवठा न करता ३८५ कोटींहून अधिक रुपयांच्या बनावट पावत्या तयार करून त्याद्वारे ७० कोटी रुपयांना फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली. या टोळीने वस्तू व सेवा कराचा समावेश असलेल्या बनावट ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ मिळविल्या होत्या. नवी मुंबई सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी ही टोळी उद्‍ध्वस्त केली. या टोळीत १४ हून अधिक व्यावसायिक कंपन्यांचा समावेश आहे. तसेच या टोळीचे जाळे मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे आणि नागपूर या शहरांत पसरल्याचे तपासात आढळून आले. या कारवाईत सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी दोन व्यावसायिकांना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. काही कंपन्यांकडून बोगस पावत्यांद्वारे वस्तू व सेवा कराचा समावेश असलेले बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवून कोट्यवधींची सीजीएसटीची लूट करण्यात येत असल्याची माहिती सीजीएसटीच्या केंद्रीय गुप्तवार्ता विभागाने दिली होती. त्यानंतर शनिवारी तपासणी करण्यात आली. त्यात ओम्निपोटेंट इंडस्ट्रीज व बिटू मॅक्स ट्रेडिंग या दोन कंपन्यांनी अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून बिटुमेन, ऍस्फाल्ट, ऑइल शेल आणि टार सँड यांसारख्या वस्तूंची खरेदी-विक्री केली होती. यासाठी बनावट पावत्यांचा वापर करण्यात आला होता. ... ६०० कोटी रुपयांचा कर वसूल या विशेष मोहिमेत ५०० पेक्षा अधिक करचुकवेगिरी करणारे सापडले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करून त्यातील ४० जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ४,५५० कोटी रुपयांची कर चुकवेगिरी आढळून आली आहे. अशा करबुड्यांकडून ६०० कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आल्याची माहिती सीमा शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त राजीव गर्ग यांनी दिली. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com