शासकीय रेखाकला परीक्षा ऑनलाईन होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय रेखाकला परीक्षा ऑनलाईन होणार
शासकीय रेखाकला परीक्षा ऑनलाईन होणार

शासकीय रेखाकला परीक्षा ऑनलाईन होणार

sakal_logo
By
शासकीय रेखाकला परीक्षा ऑनलाईन होणार मुंबई, ता. १० : राज्य कला संचालनालयातर्फे घेण्यात येणारी शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी, इंटरमिजिएट) यंदा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एलिमेंटरी, इंटरमिजिएट या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेणे धोकादायक ठरणार आहे. ​त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या परीक्षा ऑनलाईन घेण्याचे नियोजन संचालनालयाने केले आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा घेण्यात अनेक अडथळे निर्माण झाले. त्यात आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कला संचालनालयाच्या परीक्षाही आॅनलाईन पार पडणार आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण दिले जातात. या गुणांपासून विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी या परीक्षा संपूर्णत: ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. परीक्षेबाबतची माहिती व वेळापत्रक १८ जानेवारीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top