जेएनपीटीत येणारी जहाजे रोखण्याची तयारी जेएनपीटीत येणारी जहाजे रोखण्याच्या तयारीत रोखण्याच्या तयारीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेएनपीटीत येणारी जहाजे रोखण्याची तयारी
जेएनपीटीत येणारी जहाजे
रोखण्याच्या तयारीत

रोखण्याच्या तयारीत
जेएनपीटीत येणारी जहाजे रोखण्याची तयारी जेएनपीटीत येणारी जहाजे रोखण्याच्या तयारीत रोखण्याच्या तयारीत

जेएनपीटीत येणारी जहाजे रोखण्याची तयारी जेएनपीटीत येणारी जहाजे रोखण्याच्या तयारीत रोखण्याच्या तयारीत

sakal_logo
By
जेएनपीटीतील जहाजांचा मार्ग रोखण्याची तयारी पुनर्वसनास रखडल्‍याने हनुमान-कोळीवाड्यातील ग्रामस्‍थ आक्रमक उरण, ता. ११ (वार्ताहर) ः जेएनपीटी वसविण्यासाठी विस्थापित झालेल्या हनुमान-कोळीवाडा गावाचे पुनर्वसन करण्यात चालढकल करण्यात येत आहे. त्‍यामुळे आक्रमक झालेले ग्रामस्थ जेएनपीटीत जहाजे येणारा चॅनल/ समुद्रमार्ग अडविण्याच्या तयारीत आहेत. हनुमान कोळीवाडा गाव पुनर्वसनाबाबत जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ आणि उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सुषमा सातपुते यांच्यात नुकतीच बैठक झाली होती. बैठकीत जसखारजवळ कस्टम वसाहतीलगत जेएनपीटीच्या विकसित जमिनीत सरकारी मापदंडानुसार ७१० गुंठ्यात २५६ भूखंड व नागरी सुविधा देण्याचे मान्य केले होते. आराखडा बनविण्यासाठी प्रशासनाने ग्रामस्थांकडे आठ दिवस मुदत मागितली होती. मात्र आठ दिवसानंतरही उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन यांच्याकडे जेएनपीटीने आराखडा पाठविला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वारंवार याबाबत टाळाटाळ होत असल्‍याने हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ जेएनपीटीत समुद्रमार्गे चॅनलमधून येणारी जहाजे रोखून धरण्याच्या तयारीत आहेत. ज्या चॅनलमधून जहाजे येतात, त्या चॅनलमध्ये होड्या आडव्या टाकून आंदोलन करण्याची तयारी ग्रामस्‍थांनी केली आहे. यापूर्वीही ग्रामस्थांनी ‘चॅनल बंद’ आंदोलन करून जेएनपीटीचा समुद्रीमार्ग रोखला होता. त्या वेळी खासदार सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीमुळे तसेच रायगड जिल्हाअधिकारी आणि पोलिसांनी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र जेएनपीटी प्रशासनाकडून वारंवार आश्‍वासनावर बोळवण केली जात असल्‍याचे ग्रामस्‍थांचे म्‍हणणे आहे. १९८४ ला जेएनपीटी वसविण्यात आली त्‍या वेळी २५६ मच्छीमार कुटुंबे विस्थापित झाली होती. त्‍यांना हनुमान कोळीवाडा गावात बोरी पाखाडी येथे दाटीदाटीत पुनर्वसन करण्यात आले. मात्र ही जागा दुषित असल्‍याने संपूर्ण गावातील घरे वाळवीने पोखरली आहेत. शिवाय पुनर्वसन शासनाच्या निकषाप्रमाणे करण्यात आले नव्हते. याबाबत माजी नौकावहन मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अनेक बैठकी होऊन देखील हनुमान कोळीवाड्यातील नागरिक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. आठ दिवसांत याबाबत निर्णय न झाल्‍यास घारापुरी ते मोरा या जेएनपीटीच्या चॅनलमध्ये मासेमारी बोटी नांगरून मुलाबाळांसह आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्‍थांनी दिला आहे. जेएनपीटीच्या मुंबई कार्यालयात खासदार श्रीरंग बारणे यांच्यासमोर आठ दिवसात जागेचा आराखडा देण्याचे आश्‍वासन दिले होते. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क केला असता, अद्याप आराखडा मिळाल नसल्‍याचे सांगण्यात आले. पुढील आठ दिवसांत जागेचा आराखड न मिळाल्‍यास चॅनल बंद आंदोलन केले जाईल. - सुरेश कोळी, अध्यक्ष, हनुमान कोळीवाडा ग्रामसुधार मंडळ
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top