कल्याणमध्ये पक्षी-मासे विक्री करणाऱ्या दुकानाला आग

कल्याणमध्ये पक्षी-मासे विक्री करणाऱ्या दुकानाला आग

कल्याणमध्ये पक्षी-मासे विक्री करणाऱ्या दुकानाला आग कल्याण, ता. १२ (बातमीदार) : कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात मासे-पक्षी-प्राणी विक्री करणाऱ्या दुकनाला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेत अनेक मासे-पक्षी-प्राणी जळून खाक झाले. कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोडवर रामबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक वर्षांपासून पक्षी, प्राणी आणि मासे विक्री करणारी छोटी दुकाने आहेत. आज सकाळी अचानक येथील एका दुकानाला आग लागली. स्थानिकांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीने रौद्र रूप धारण केल्याने अग्निशमन दलाला याठिकाणी पाचारण करण्यात आले. त्यानंतर ही आग विझविण्यात यश आले. तसेच काही पक्षी-प्राण्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. आग नेमकी कशामुळे लागली, याचे ठोस कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन अधिकारी विनायक लोखंडे यांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com