जेएसएम महाविद्यालयात
सूर्यनमस्कार संकल्प
२१ दिवस उपक्रम सुरू राहणार
अलिबाग, ता. १२ (बातमीदार) : राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने अलिबाग शहरातील जेएसएम महाविद्यालयातील सूर्यनमस्काराचा संकल्प करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभाग व भारत स्वाभिमान न्यास यांच्या वतीने हा कार्यक्रम होत आहे.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशन आणि इतर चार संस्थानी ३० राज्यांमध्ये ७५० दशलक्ष म्हणजेच ७५ कोटी सूर्यनमस्कार करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात जेएसएम महाविद्यालयाने सहभाग घेतला. महाविद्यालयातील १९३३ विद्यार्थी व ३१ शिक्षक यांनी सहभाग घेतला. हा उपक्रम १२ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत सुरू राहणार आहे.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. दैनंदिन जीवनात निरोगी आयुष्यासाठी सर्वांनी रोज सूर्यनमस्कार करावेत असे आवाहन केले. त्यानंतर भारत स्वाभिमान न्यास रायगड विभागाचे प्रभारी दिलीप गाटे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सूर्यनमस्कार करण्याचे फायदे, सूर्यनमस्कार योग्य पद्धतीने कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन डॉ. प्रवीण गायकवाड यांनी केले; तर आभार डॉ. ईश्वरदास कोकणे यांनी मानले. कार्यक्रसाठी युवा भारत रायगड विभागाचे प्रभारी दीपक गाटे, तसेच महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मोहसीन खान, डॉ. प्रेम आचार्य, डॉ. मीनल पाटील, डॉ. सुनील आनंद, बी. आर. गुरव उपस्थित होते.