तोतया पोलिसांनी वृद्धाची सोनसाखळी पळवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोतया पोलिसांनी वृद्धाची सोनसाखळी पळवली
तोतया पोलिसांनी वृद्धाची सोनसाखळी पळवली

तोतया पोलिसांनी वृद्धाची सोनसाखळी पळवली

sakal_logo
By
तोतया पोलिसांनी वृद्धाची सोनसाखळी पळवली भिवंडी, ता. १२ (बातमीदार) : पोलिस असल्याची बतावणी करत वयोवृद्धाकडील ७५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी चोरून नेल्याची घटना भिवंडी तालुक्यातील माणकोली नाका येथे घडली. या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुकिर चौधरी (७५, रा. दापोडे) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. मंगळवारी (ता. ११) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली नाका येथून दुचाकीवरून जात असताना चौधरी यांना दोघांनी थांबवून पोलिस असल्याची बतावणी केली. तुम्ही हेल्मेट घातलेले नाही, गाडीचे पेपर दाखवा असे सांगत, सोनसाखळी का घातली, अशी विचारणा केली. सध्या चोऱ्या वाढल्याचे सांगत चौधरी यांना विश्वासात घेऊन दोघांनी त्यांना गळ्यातून सोनसाखळी काढायला भाग पाडले. त्यातील एकाने ही चेन हातात घेत कागदामध्ये ठेवल्याचे दाखवून हातचालाखीने आपल्या ताब्यात ठेवून पलायन केले.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top