संक्रांतीनिमित्त भोगीच्या मिक्स भाजीचे दरही गगनाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्रांतीनिमित्त भोगीच्या मिक्स भाजीचे दरही गगनाला
संक्रांतीनिमित्त भोगीच्या मिक्स भाजीचे दरही गगनाला

संक्रांतीनिमित्त भोगीच्या मिक्स भाजीचे दरही गगनाला

sakal_logo
By
संक्रांतीनिमित्त भोगीच्या मिक्स भाजीचे दरही गगनाला महागाई आणि कमी आवकमुळे प्रतिकिलो भाव वाढले ठाणे, ता. १२ (बातमीदार) : पौष माहिन्यातील मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण सर्वत्र साजरा केला जातो. संक्रांतीनिमित्त गुळाची पोळी आणि त्यावर साजूक तुपाची धार असा झकास बेत असला तरी, आदल्यादिवशी खवय्यांसाठी भोगीच्या लज्जतदार जेवणालाही तितकेच महत्त्व असते. वांगी, हरभरा, पावट्याच्या शेंगा, गाजर, घेवडा, भुईमूग शेंगा, बोरे आदी भाज्या एकत्रित करून बनवण्यात येणारी मिक्स भोगीची झणझणीत मसालेदार भाजी ही घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची. मात्र महागाई आणि मागणीच्या तुलनेत बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी असल्याने यंदा भोगीच्या मिक्स भाजीला महागाईची फोडणी बसली आहे. सध्या ठाण्यातील मुख्य भाजी मंडईत भोगीची मिक्स भाजी प्रतिकिलो ८० रुपये; तर किरकोळ विक्रेत्यांकडे १५० रुपयांनी विकली जात आहे. गुरुवारच्या भोगी सणानिमित्त ठाण्यातील बाजारपेठेत बुधवारी दुपारपासून खरेदीसाठी गृहिणींची लगबग सुरू होती; परंतु सध्याची वाढती महागाई आणि भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या काही भाज्यांचे भाव वधारल्यामुळे गृहिणींना भाजी खरेदीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागले. मागील वर्षी भोगीची मिक्स भाजी ही मुख्य मंडईत ४० ते ६० रुपये प्रतिकिलो तर किरकोळ भाजी विक्रेत्यांकडे १२० रुपये प्रतिकिलोने विकली जात होती; परंतु भोगीच्या सणानिमित्त भाज्यांच्या मागणीत वाढ झाल्याने मुख्य मंडईत भोगीची मिक्स भाजी यंदा प्रतिकिलो ८० रुपये, तर किरकोळ विक्रेत्यांकडे १५० रुपयांनी विकली जात आहे. सणांच्या निमित्ताने गृहिणींना स्वयंपाकघराचे आर्थिक बजेट सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे. यंदा अवकाळी पाऊस, इंधनाचे वाढलेले दर अशा अनेक कारणांमुळे मंडईत काही भाज्यांचे दर वाढले आहेत. तसेच भोगीच्या निमित्ताने हमखास खरेदी केल्या जाणाऱ्या भाज्यांना सध्या अधिक मागणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भोगीच्या मिक्स भाजीत प्रतिकिलो प्रमाणे १० रुपयांची वाढ केली आहे. - सविता शिंदे, किरकोळ भाजी विक्रेत्या. भोगी सणानिमित्त बनवली जाणारी मिक्स भाजी खाण्यासाठी कुटुंबीय वर्षभर वाट पाहतात. सध्या भाज्यांचे दर वाढल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून भोगीची मिक्स पाव किलो भाजी खरेदी करण्यासाठी ४० रुपये मोजावे लागत आहेत. - दीपाली मोरे, ग्राहक. भाज्यांचे दर प्रतिकिलो गाजर - ८० रुपये वांगी १५० रुपये हरभरा - ९० ते १०० रुपये घेवडा- १२० रुपये भुईमूग शेंगा- १०० रुपये पावट्याच्या शेंगा - ११० रुपये
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top