एक लाख लोकांची मधुमेह तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक लाख लोकांची मधुमेह तपासणी
एक लाख लोकांची मधुमेह तपासणी

एक लाख लोकांची मधुमेह तपासणी

sakal_logo
By
एक लाख लोकांची मधुमेह तपासणी नऊ हजार संशयित; नियमित उपचार घेण्याच्या सूचना सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १२ : जागतिक मधुमेह दिनानिमित्त मुंबईतील एक लाख लोकांची मधुमेह तपासणी करण्यात आली होती. त्यात ९ हजार २३१ मधुमेह संशयित व्यक्तींचे निदान करण्यात आले. निदान झालेल्या रुग्णांना त्यांच्या सोयीच्या महापालिका दवाखाना किंवा रुग्णालयात नियमित उपचार घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डाॅ. मंगला गोमारे यांनी दिली. दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस ''जागतिक मधुमेह दिन'' म्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत ८ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत मधुमेह जागरूकता अभियानांतर्गत एकूण एक लाख नागरिकांची मधुमेह तपासणी करण्यात आली होती. याचा अहवाल पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकताच जारी केला आहे. त्यानुसार चाचणीत नऊ हजार जणांना मधुमेह असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. रुग्णालयात संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यातील २,४१५ जणांना मधुमेहाचे निदान झाले आहे; तर १८८९ जणांना मधुमेहाचा धोका वर्तवण्यात आला आहे. या व्यक्तींना आहार व जीवनशैलीतील बदलांविषयक समुपदेशन करण्यात आले असून त्यांना नियमितपणे मधुमेह तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, सर्व महापालिका दवाखान्यांमध्ये मधुमेह रुग्णांकरिता तपासणी, निदान, उपचार आणि आवश्यकतेनुसार सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याचे डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. जीवनशैलीत सकारात्मक बदल केल्यास मधुमेहाच्या सीमारेषेवर असणाऱ्या व्यक्तींना मधुमेह टाळता येईल. तसेच मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवल्यास गुंतागुंतींचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी व्यक्त केला आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top