ईव्ही सोबत होंडाची 
१०० सीसी बाईक लवकरच

ईव्ही सोबत होंडाची १०० सीसी बाईक लवकरच

गुरुग्राम : मोटारसायकल उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या होंडा मोटारसायकल अॅन्ड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) कंपनीने पुढील वर्षी मोटारसायकलमधील विविध ईव्ही मॉडेल बाजारात आणण्याची तयारी केली आहे. याशिवाय लो-एंड मोटारसायकलचा विस्तार करण्याचे निश्चित केले असून, १०० सीसी बाईक लवकरच बाजारात आणली जाणार आहे.
कंपनीच्यावतीने विस्ताराच्या विविध योजना जाहीर करण्यात आल्या. यात कंपनीच्या मानेसर (हरियाना) येथील निर्मिती प्रकल्पाचे ‘मेकिंग इन इंडिया फॉर द वर्ल्ड’साठी ग्लोबल रिसोर्स फॅक्टरी म्हणून बळकटीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
‘एचएमएसआय’चे व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘‘कंपनी भारतात आणखी विस्तार करणार आहे. याशिवाय फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञानाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याचे नियोजन केले आहे. तसेच कंपनी ईव्ही मॉडेल्सची श्रेणी तयार करण्यासाठी यंत्रणा विकसित करीत आहे. लवकरच ईव्ही मॉडेल भारतीय बाजारात येतील.’’
‘एचएमएसआय’च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘‘कमीत कमी किमतीच्या मोटरसायकल बनविण्यावर कंपनी यापुढे भर देणार असून लवकरच आमची १०० सीसी मोटारसायकल बाजारात येईल. कोरोनानंतर शाळा महाविद्यालये सुरू झाल्याने महाराष्ट्रातील पुणे, मुंबई या शहरांमधील स्कूटरची मागणी वाढली आहे. कंपनीच्या वतीने बेंगळुरूसह आठ शहरांत लवकरच बॅटरी स्वॅपिंग सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.
----------------
फोटो ः ५९०१९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com