नवाब मलिक यांना सशर्त जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवाब मलिक 
यांना सशर्त जामीन
नवाब मलिक यांना सशर्त जामीन

नवाब मलिक यांना सशर्त जामीन

sakal_logo
By
नवाब मलिक यांना सशर्त जामीन सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १२ : भाजपचे नेते मोहित कंभोज यांनी केलेल्या मानहानीच्या खटल्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना माझगाव न्यायालयाने १५ हजार रुपयांचा सशर्त जामीन आज मंजूर केला. आर्यन खान अटक प्रकरणात मलिक यांनी कंभोज यांच्याबाबत वादग्रस्त विधाने केली आहेत. यामुळे माझी आणि माझ्या कुटुंबियांची बदनामी झाल्याचा आरोप कंभोज यांनी दोन स्वतंत्र मानहानीच्या तक्रारींद्वारे केला. यावर आज झालेल्या ऑनलाईन सुनावणीमध्ये मलिक यांच्यासह सर्व पक्षकार उपस्थित होते. सुनावणीदरम्यान वकील फैज मर्चंट यांच्याबरोबर बाचाबाची झाली; मात्र न्यायालयाने हस्तक्षेप केल्यावर मलिक यांनी दिलगिरी व्यक्त केली. भविष्यात कंभोज यांच्याबाबत विधान करण्यासाठी न्यायालयाने मलिक यांना तूर्तास मनाई केली आहे. तसेच उल्लंघन केल्यास जामीन रद्द होऊ शकतो, असेही स्पष्ट केले आहे. पुढील सुनावणी २९ जानेवारीला होणार आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top