भायखळ्यात गोदामाला आग

भायखळ्यात गोदामाला आग

भायखळ्यात गोदामाला आग मुंबई, ता. १२ : भायखळा मदनपुरा येथील गोदामाला आज संध्याकाळी लागलेली आज रात्री उशिरापर्यंत अटोक्यात आलेली नव्हती. आग आजूबाजूला पसरू नये म्हणून अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू होते. आगीचे कारण समजू शकलेले नाही. आगीत जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मदनपुरा परिसरातील तस्लिमा हाईट इमारतीच्या मागे असलेल्या एक मजली गोदामाला संध्याकाळी ७.४० च्या दरम्यान आग लागली. गोदामातील ज्वलनशील साहित्यामुळे आग वेगाने पसरली. अग्निशमन दालाचे आठ बंब आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न मध्यरात्रीपर्यंत करत होते. त्यात कोणीही जखमी झालेले नसल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळाच्या बाजूला इतरही गोदामे आहेत. त्यांमध्ये आग पसरू नये यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com