मास्क वापरा बक्षीस जिंका!
धारावी, ता. १३ (बातमीदार) : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये मास्क वापरण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आपकी अपनी पार्टीच्या वतीने धारावी आणि सायन विभागात ‘मास्क वापरा आणि बक्षीस मिळवा’ हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचा आरंभ धारावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळवंत पाटील यांच्या हस्ते धारावी पोलिस ठाण्यात करण्यात आला. यावेळी पार्टीचे मुंबई प्रवक्ता तुलसी गुप्ता, दक्षिण-मध्य मुंबई अध्यक्ष देवा रेड्डी, धारावी वार्ड क्रमांक १८४ चे अध्यक्ष राहुल जैस्वार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक वेळा नागरिकांना मास्क वापरण्यासंदर्भात आवाहन करण्यात येत आहे. पण तरीही काही नागरिक याविषयी गंभीर होताना दिसत नाहीत. त्यासाठी आपकी अपनी पार्टीतर्फे गिफ्ट कुपन देण्याचा हा एक नवा प्रयत्न आहे. जो मुंबईतील प्रत्येक प्रभागात सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सर्वसामान्य नागरिकांना बक्षिसांच्या माध्यमातून मास्क वापरण्याकरिता प्रवृत्त करणे व कोरोनासारखी महामारी पसरण्यापासून थांबवणे हा त्यामागचा हेतू आहे.
...