प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव
१४ जानेवारीला रवींद्र नाट्यमंदिरात रंगणार
मुंबई, ता. १३ : मुंबई व महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, खेळ आदी क्षेत्रांत कार्य करणाऱ्या ‘प्रबोधन गोरेगाव’ संस्थेद्वारे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. १४ जानेवारीला पु. ल. देशपांडे कला अकादमीत हा सोहळा होणार असून लोकप्रिय अभिनेते संदीप कुलकर्णी प्रमुख पाहुणे असणार आहेत. महाराष्ट्राचे उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
लघुपट करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या जगभरातील मराठी कलावंतांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे करण्यात आले आहे. लघुपटांच्या निर्मितीसोबत त्यांचे मार्केटिंग आणि विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत सहभाग घेण्याबाबत मार्गदर्शनही देण्यात येणार आहे. प्रख्यात जागतिक कीर्तीचे चित्रपट समीक्षक, अभ्यासक व दिग्दर्शक अशोक राणे हे या ‘महोत्सव संचालक’ म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. केवळ निमंत्रितांसाठी प्रवेश दिला जाणार आहे.
या महोत्सवासाठी ७० हून अधिक मराठी लघुपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यामधून निवड समितीने १५ लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे. या वेळी विविध वर्गात पुरस्कारही देण्यात येणार आहेत.
...