वसई-विरारमध्ये हॅण्ड वॉश केंद्र सुरू करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई-विरारमध्ये हॅण्ड वॉश केंद्र सुरू करण्याची मागणी
वसई-विरारमध्ये हॅण्ड वॉश केंद्र सुरू करण्याची मागणी

वसई-विरारमध्ये हॅण्ड वॉश केंद्र सुरू करण्याची मागणी

sakal_logo
By
वसई-विरारमध्ये हॅण्ड वॉश केंद्र सुरू करा वसई (बातमीदार) : पहिल्या-दुसऱ्या लाटेत वसई-विरार शहरामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला त्या वेळी सार्वजनिक ठिकाणी हॅण्डवॉश केंद्र उभारण्यात आले; मात्र सद्यस्थितीत हे केंद्र नादुरुस्त आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने या केंद्रांची देखभाल महापालिकेने करून ते नव्याने सुरू करावेत, अशी मागणी शहरातील वकील नेहा दुबे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. महापालिकेने सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी हॅण्ड वॉश केंद्राची व्यवस्था केली होती. पाणी, साबण, सॅनिटायझर या केंद्रांवर ठेवण्यात आले; मात्र या ठिकाणी आता घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे पालिकेने केलेला खर्च वाया गेला आहे. गर्दीच्या ठिकाणी कोरोना संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे शहरातील हॅण्डवॉश केंद्र दुरुस्त करून सुरु करण्यात यावीत, अशी मागणी अॅड. दुबे यांनी पत्राद्वारे केली आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top