ग्रामीण भागातील ४ लाख नागरिक पहिल्या डोस विना

ग्रामीण भागातील ४ लाख नागरिक पहिल्या डोस विना

चार लाख नागरिक पहिल्या डोसविना ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लसीकरणाचे आव्हान राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. १३ : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण वाढण्यासाठी राज्य सरकारसह विविध शासकीय व आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तब्बल चार लाख नागरिकांनी अद्याप पहिला डोस न घेतल्याची गंभीर बाब समोर आली आहे. जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या लसीकरणाच्या आवाहनालाच नागरिक फाटा देत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या दोन्ही लाटेत ग्रामीण भागातील ४५ हजार १२७ रुग्ण बाधित झाले होते. त्यापैकी ४१ हजार ६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या आजाराने आतापर्यंत एक हजार २४१ जणांचा मृत्यू झाला. लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीला शहरी भागासह ग्रामीण भागात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. मात्र, लसीकरणाबाबत उठलेल्या अफवा व गैरसमजुतींमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरण मोहीम मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागात शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील १५ लाख ९३ हजार ३७३ नागरिकांपैकी ११ लाख ७४ हजार ९३७ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे; तर ७ लाख ३७ हजार ९४५ नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. दुसरीकडे तब्बल ४ लाख १८ हजार ४३६ नागरिकांनी लसीचा पहिला डोसच घेतला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. राज्यातील पहिला ओमिक्रॉन रुग्ण डोंबिवलीत सापडला होता. आता दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढत होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशातच ज्या नागरिकांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ ओढवत नसल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे. लस न घेण्याच्या प्रवृत्तीमुळे मात्र आयसीयुमध्ये नागरिकांना भरती करण्याची वेळ येत आहे. चौकट प्रबोधनात्मक कार्यक्रमातून जागृती ग्रामीण भागातील लसीकरणाचा मंदावलेला वेग पुन्हा वाढावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी देखील पुढाकार घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील गावागावांमध्ये लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येत असून लसीकरणाबाबत असलेल्या गैरसमजुतींचे निरसन करण्यासाठी विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम करून त्यांच्यात जनजागृती करण्यात येत आहे. कोट ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत अनेक गैरसमजुती व शंका कुशंका आहेत. या सर्व शंकांचे निरसन करून व जनजागृती करून नागरिकांना लस का घ्यावी, याचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात लसीकरणाचा वेग वाढल्याचे दिसून येईल. तसेच ग्रामीण भागात १५ ते १८ वयोगटातील तरुणांचे आतापर्यंत ४५ टक्के लसीकरण झाले आहे. - डॉ. मनीष रेंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. ठाणे. चौकट तालुके डोस न घेतलेल्यांची संख्या अंबरनाथ (ग्रा) ५५०२१ बदलापूर (नगरपालिका) ६२३६५ अंबरनाथ (नगरपालिका) १,०९,४५० अंबरनाथ ब्लॉक(शहरी+ग्रामीण) २,२६,८३६ भिवंडी ८५,४२५ कल्याण ३४,७३८ मुरबाड १७,१८३ शहापूर ५४,२५४ ठाणे ग्रामीण २,४६,६२२ एकूण ४,१८,४३६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com