दिडशे मापड्यांवर गुन्हा दाखल

दिडशे मापड्यांवर गुन्हा दाखल
Published on
एपीएमसी मार्केटमध्ये मापाड्यांचे आंदोलन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह दीडशे जणांवर गुन्हा नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : कांदा-बटाटा मार्केटमधील एपीएमसीच्या मुख्य कार्यालयासमोर बेकायदेशीररीत्या आंदोलन केले होते. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट व जनरल कामगार युनियनचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह दीडशे मापाडी कामगारांविरोधात एपीएमसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकार व नवी मुंबई पोलिसांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट व जनरल कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी एपीएमसी मार्केटमधील मापाड्यांच्या मागण्यांसंदर्भात कांदा-बटाटा मार्केटमधील एपीएमसीच्या मुख्य कार्यालयासमोर विनापरवानगी आंदोलन केले. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट व जनरल कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, शाम ढमाले, गजानन कुरडे, सुशीलकुमार गावडे, मधुकर जाधव, रवींद्र माने या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सुमारे दीडशे मापाडी कामगार सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कोरोना नियमावलीचे पालन न केल्याचे आढळून आले. त्यामुळे एपीएमसी पोलिसांनी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सुमारे दीडशे मापाड्यांविरोधात मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MP naresh Mhaske and MP Shrikant Shinde
Anna Bansode
Local Trains Late Every Day Banner Near Kopar Station
csmt railway station
Marathi News Esakal
www.esakal.com