महापालिकेच्या ८० सेवा व्हॉट्सॲपवर

महापालिकेच्या ८० सेवा व्हॉट्सॲपवर

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासह ८० सेवा व्हॉट्सॲपवर मुंबईकरांना २४ तास हवी ती माहिती मिळणार सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता.१४ : जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासह मुंबई महापालिकेच्या तब्बल ८० सेवा आता व्हॉट्सॲपवर उपलब्ध होणार आहेत. ८९९९२२८९९९ या व्हाॅट्सॲप क्रमांकावरून नागरिकांना २४ तास आवश्यक ती माहितीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज या सेवेचे लोकार्पण झाले. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासह महापालिकेच्या विविध सुविधाही या क्रमांकावरून उपलब्ध होतील. त्याचबरोबर विविध शुल्क, कर, परवानेही उपलब्ध होणार आहेत. परिसरातील पालिका दवाखाने, रुग्णालये, कोविड केअर सेंटर, पालिका शाळा, उद्याने, पर्यटन स्थळे, अग्निशमन केंद्रे आदी बाबींची माहिती तात्काळ या सेवेद्वारे उपलब्ध होणार आहे. आज या सेवेच्या ऑनलाईन लोकार्पण कार्यक्रमात मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. -------- अशी मिळवा माहिती ८९९९२२८९९९ या क्रमांकावर मराठीमध्ये ‘नमस्कार’ आणि इंग्रजीमध्ये ‘नमस्ते’ किंवा ‘हाय’ असा संदेश पाठवल्यानंतर पालिकेच्या बोधचिन्हासहीत अधिकृत उत्तर प्राप्त होईल. याच उत्तरानंतर मराठी वा इंग्रजी असे दोन पर्याय येतील. यापैकी एका पर्यायावर ‘क्लिक’ केल्यानंतर नागरिक, व्यवसाय अथवा पर्यटक असे तीन पर्याय येतील. यापैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्या पर्यायानुसार महापालिकेच्या सेवा-सुविधांशी संबंधित पर्याय नागरिकांना उपलब्ध होतील. नागरिकांद्वारे जे पर्याय निवडले जातील, त्या पर्यायानुसार तब्बल ८० सेवा-सुविधांविषयीची माहिती नागरिकांना तात्काळ उपलब्ध होईल. यामध्ये संबंधित पत्ते, संपर्क क्रमांक, संक्षिप्त माहिती यांसारख्या बाबींचा समावेश आहे. ---- तक्रारी, सूचना आणि शुल्क भरणाही व्हॉट्सॲप क्रमांकावरून नागरिकांना महापालिकेशी संबंधित तक्रारी व सूचनाही करता येणार आहेत. यासोबत विविध शुल्क, आकार इत्यादींचा भरणा करण्यासाठी युपीआय आधारित ऑनलाईन सेवाही उपलब्ध आहे. येथे नागरिकांना विविध घडामोडींची अद्ययावत माहिती मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com