स्वादिष्ट माशांच्या शर्यतीत जिताडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वादिष्ट माशांच्या शर्यतीत जिताडा
स्वादिष्ट माशांच्या शर्यतीत जिताडा

स्वादिष्ट माशांच्या शर्यतीत जिताडा

sakal_logo
By
जिताड्याने जिंकले वेगळ्या चवीमुळे पर्यटकांचीही पसंती सुनील पाटकर जिताडा माशाचे नाव घेतले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. हा मासा मनसोक्त खाण्यासाठी पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्याकडे वळतात. त्यामुळेच तो सध्या पसंतीबाबत पहिल्या क्रमांकाकडे वाटचाल करत आहे. जिताडा माशाविषयी अनेक गमतीजमती ऐकण्यास मिळतात. पूर्वी जी कामे पैशाने करणे अशक्य होते ती कामे जिताड्याच्या लज्जतदार चवीने सहज पूर्ण होत, असे जाणकार सांगतात. राजकीय नेत्यांबरोबरच प्रसिद्ध व्यक्तींनाही या माशाचा मोह आवरता येत नाही. रायगड आणि नवी मुंबई परिसरात प्रसिद्ध असलेला हा मासा जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्यात मागे आहे. या माशाचे रायगड जिल्ह्यात उत्पादन नैसर्गिकरित्या होते. डहाणूपासून चिपळूणपर्यंतच्या वाशिष्ठी नदीमध्ये, खारफुटीत त्याचे प्रजनन होते. त्यामुळे खारफुटी महत्त्वाची मानली जाते. सध्या अलिबाग, पेण या परिसरात पिल्लांची वाढ करणारी अनेक मत्स्यतळी आहेत. सुमारे दीड ते दोन हजार तळी त्यासाठी आहेत. जिताडा माशाचे उत्पदन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले की, मत्स्य तलावात जुलै ते जानेवारी या काळात जिताड्याचे उत्पादन घेतले जाते. सुमारे एक ते ५ किलोपर्यंतच्या माशाचे वजन असते. त्याला ८०० रुपये किलो दर मिळतो. सध्या पापलेट, हलवा यांसारख्या माशांनाही जिताडा मागणीच्या बाबत मागे टाकत आहे. पर्यटकांच्याही पहिल्या पसंतीचा हा मासा ठरला आहे. खारेपाट भागात खाडीचे बंधारे वारंवार कोसळतात. त्यामध्ये मत्स्य तळी नष्ट होतात. यासाठी उत्तम दर्जाचे बंधारे आवश्‍यक आहेत. या माशाच्या चवीने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तरीही रायगड जिल्ह्यापुरता सीमित आहे. पर्यटन वाढीला चालना मिळावी. त्यातून जिताडा उत्पादकांची प्रगती साधावी यासाठी या भागातील उत्पादन वाढीसाठी प्रयत्न आवश्यक आहेत. जिताड्याचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग व्हावे यासाठी समूह गट, बचत गट, शेतकऱ्यांतर्फे प्रयत्न केले जात आहेत. ....... या आहेत अडचणी - रोजगार हमीमधून माशांसाठी तलाव खोदावे लागतात. यासाठी ८० हजार रुपये अनुदान मिळते; परंतु प्रत्यक्षात दीड लाख रुपये तळ्यासाठी खर्च येतो. - शेततळी मत्स्य तळ्यापर्यंत जाण्यासाठी रस्त्यांचा अभाव - खारफुटीची तोड हा या माशांच्या मुळावर - मत्स्य तलावांची केंद्रीय शेती प्राधिकरणाकडे नोंद नाही - पर्यटन व निर्यात वाढीसाठी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांचा अभाव .............. स्थानिक तरुण, शेतकऱ्यांना मत्स्य उत्पादनाच्या प्रवाहात आणले जात आहे. जिताडा माशाची विक्री करण्यासाठी सध्या कोणत्याही अडचणी येत नाहीत; परंतु त्याचे उत्पादन वाढवून अधिकाधिक शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचा व पर्यटनाशी त्यांची सांगड घालण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. - राजन भगत, समन्वयक, जिताडा संवर्धन प्रकल्प. ........ असा आहे जिताडा १०० ग्रॅम जिताड्यात प्रथिन १३.७ ग्रॅम असतात. कॅल्शिअम ५३० मिग्रॅ असते. फॉस्फरस ४०० मिग्रॅ, लोह १ मिग्रॅ, सोडियम १६ मिग्रॅ, पोटॅशियम १७३ मिग्रॅ., तांबे ०.११ मिग्रॅ.; क जीवनसत्त्व १० मिग्रॅ. कोलीन ३४९ मिग्रॅ असतात. १०० ग्रॅमपासून ७३ कॅलरी मिळतात. ......
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top