मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सामाजिक बांधिलकी

मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सामाजिक बांधिलकी

जलशुद्धीकरण प्रकल्‍प ‘राष्ट्रीय मिशन’ला रामकी फाउंडेशन व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे योगदान वसंत जाधव/ सकाळ वृत्तसेवा पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक विभागातील नागरिकांना शुद्ध पाणीही मिळत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून रामकी फाउंडेशन व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनी यांच्यामार्फत सीएसआर फंडातून शहरातील विविध भागांत सहा जलशुद्धीकरण प्रकल्‍प बसविण्यात आले आहेत. त्‍यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होत आहे. पनवेल तालुक्‍यात नागरिकरण वाढल्‍याने पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्‍यात ग्रामीण भागातील परिस्‍थिती आणखीनच बिकट आहे. आजही अनेक गावे बोअरवेल अथवा विहिरीच्या पाण्यावर आपली तहान भागवत आहेत. वास्तविक आरोग्‍याचा विचार करता, हे पाणी शुद्ध व स्वच्छ करून देणे ही स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. परंतु निधीअभावी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पिण्याचे पाणी सहजासहजी उपलब्ध नसलेल्या दुर्गम गावे, आदिवासी वाड्यांमध्ये आरओ वॉटर फिल्टर प्रकल्‍प उभारून रामकी फाउंडेशन व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनी ‘राष्ट्रीय मिशन’ अभियानात आपले योगदान देत आहेत. शुद्धीकरण प्रकल्‍पासाठी ५४ लाख तळोजा एमआयडीसीलगतच्या गावांमध्ये रामकी फाउंडेशन व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनीने सहा आरओ वॉटर फिल्टर प्रकल्‍प उभारले आहेत. एका आरओ वॉटर फिल्टर प्रकल्‍पाची किंमत सुमारे ९ लाख रुपये आहे. गामस्‍थांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्‍ध व्हावे यासाठी जवळपास ५४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. याशिवाय फाउंडेशनकडून आणखी काही गावांमध्ये आरओ प्लांट बसविण्यात येणार आहेत. विविध उपक्रम सुरू गावांमध्ये आरओ प्रकल्‍प उभारण्याबरोबरच रामकी फाउंडेशनने विविध प्रकारचे सीएसआर प्रकल्प सुरू केले आहेत. महिला आणि तरुणांसाठी उपजीविका कार्यक्रम, टेलरिंग केंद्र आणि संगणक केंद्रे स्थापन करणे, शेतकरी क्लब स्थापन करणे आणि त्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देणे, शाळा दुरुस्तीचे काम करणे, शाळेतील शौचालये बांधणे असे विविध प्रकल्‍प मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनीच्या सीएसआर विभागाकडून राबविण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेसाठी रेफ्रिजरेटर नैसर्गिक आपत्तीत रामकी फाउंडेशन व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनीने नेहमीच मदतीचा हात दिला आहे. फाउंडेशनने कोविडच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत बाधित लोकांना किराणा सामानाचे वाटप केले. कोकण विभागातील पूरग्रस्तांनाही आवश्यक साहित्याची मदत केली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये रामकी फाउंडेशन व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनीने लसीकरण मोहिमेसाठी लस साठवण्यासाठी एमजीएम रुग्‍णालयाला आयएलआर रेफ्रिजरेटर प्रदान केले आहे. चौकट गावाचे नाव आरओ प्रकल्‍प सिद्धी करावले २ तळोजा मजकूर२ धरणा कॅम्प १ पाले खुर्द १ कोट पनवेलमधील ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणीही मिळत नाही. ग्रामस्‍थांच्या आरोग्‍याचा विचार करून रामकी फाउंडेशन व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनी यांच्यामार्फत सहा जलशुद्धीकरण प्रकल्‍प उभारण्यात आले आहेत. सीएसआर निधीमधून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. - सोमनाथ मालघर, संचालक, मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com